Women’s Reservation Bill Row:  saam tv
देश विदेश

सरकारचं मोठं षडयंत्र हाणून पाडलं; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Women’s Reservation Bill Row: जनतेला आता सर्व काही समजते आणि भारत बदलला आहे. सरकारने कितीही प्रचार केला तरी जनतेचा विश्वास सातत्याने कमी होत आहे आणि राजकीय प्रचाराने वास्तव बदलता येत नाही, अशा शब्दात प्रियंका गांधींनी सरकार शरसंधान केलं.

Bharat Jadhav

  • प्रियंका गांधींचा महिला आरक्षण विधेयकावर हल्लाबोल

  • विरोधकांच्या एकजुटीने सरकारचा प्रस्ताव फेटाळला

  • विधेयकावर ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा आरोप

एनडीए सरकारनं लोकसभेत मांडलेलं महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आहे. या महिला आरक्षणासंदर्भात घडामोडींवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी याला लोकशाहीचा मोठा विजय म्हटलंय. तसेच विरोधी पक्षांनी एकजुटीने सरकारचा संघराज्यीय रचना कमकुवत करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

हा प्रस्ताव महिला आरक्षणाबद्दल नसून मतदारसंघ पुनर्रचनेचा होता. सरकारचा राजकीय संतुलन बदलण्याचा प्रयत्न होता,जो हाणून पाडला. "विरोधी पक्ष कसे एकत्र येऊ शकतात आणि सरकारला कसे हरवू शकतात, हे आता स्पष्ट झाले आहे याचा मला आनंद आहे, असं प्रियंका गांधी पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

शुक्रवारी लोकसभेत सरकारनं मांडलेले नारी शक्ती वंदन महिला आरक्षणाचे विधेयक नामंजूर करण्यात आले. विरोधकाचा मोठा विजय असल्याचे म्हटलं, त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली. तर अमित शाह यांनीही काँग्रेससह विरोधकांना इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

प्रियंका गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केला की, निवडणुका धामधुमीत संसदेचे अधिवेशन घाईघाईने बोलावण्यात आले. विधेयकाचा मसुदा केवळ एक दिवस आधी सादर करण्यात आला. "हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट होता. सरकारला वाटले की, विधेयक मंजूर झाले तर तो विजय असेल आणि ते नामंजूर झाले तरी तो विजयच असेल.,असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

तारणहार होण्याचा सरकारचा प्रयत्न

सरकारने कायमस्वरूपी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःला 'महिलांचा तारणहार' म्हणून स्वत: दाखवण्याचा प्रयत्न केला. सरकारनं महिलांना ढाल म्हणून त्यांचा वापरण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. हाथरस, मणिपूर आणि महिला खेळाडूंचे मुद्दे उपस्थित करत प्रियंका गांधी म्हणाल्या, महिला सक्षमीकरणाबाबतचे सरकारचे दावे जमिनीवरील वास्तवाशी विसंगत आहे.

सरकारनं काळा दिवस का पाळला?

मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा राजकीय धक्का बसल्यामुळे ते काळा दिवस पाळत आहे. प्रियंका गांधी यांनी मागणी केली की, सरकारने २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी करावी, जेणेकरून महिलांना खरे प्रतिनिधित्व मिळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT