Priyanka Gandhi SaamTvNews
देश विदेश

"भाजपला जनतेशी देणेघेणे नाही, येनकेन प्रकारे सत्ता मिळवणे हेच त्यांचे ध्येय!"

आज काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या गोव्यात माजोर्डा, नुवेम, नावेलीम, सांता क्रूज आणि कुंबर्जुआ या पाच ठिकाणी सभा आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- प्राची कुलकर्णी

गोवा : देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर आहेत. आज दिवसभरात 'जैत यात्रा" माध्यमातून गोव्यातील जनतेला प्रियांका गांधी संबोधित करत आहेत. आज प्रियांका गांधी यांच्या गोव्यात पाच ठिकाणी प्रचार सभा आहेत. माजोर्डा, नुवेम, नावेलीम, सांता क्रूज आणि कुंबर्जुआ या ठिकाणी प्रियांका यांच्या सभा आहेत.

हे देखील पहा :

नुवेम (Nuvem) येथे काँग्रेसच्या (Congress) प्रचारसभेत संबोधन करताना प्रियांका गांधींनी मोदी-शहा यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणाची सुरुवात प्रियांका गांधी यांनी भारतरत्न, गानकोकिळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहून केली.

यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, मला तुमच्या समोर बोलताना आनंद होतोय. खरंतर तुम्ही आता भाषणांना आणि नेत्यांच्या वक्तव्यांना कंटाळले असाल. आमच्या नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होणार का असा तुम्हांला प्रश्न पडला असेल. मात्र, गेल्या वेळेस भाजपने ज्या पद्धतीचे राजकारण करून सत्ता खेचून घेतली गेली. आपल्या उद्योगपती मित्रांसाठी फायदा मिळावा म्हणून ही पावलं उचलली गेली.

पर्यावरणाचा ऱ्हास करुन स्वत:चा फायदा केला जातोय. पण, याचा गोव्यातल्या लोकांना काही फायदा नाही. खाणींमुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीप्रमाणे गोव्याला ही नेते मंडळी पाहतात. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचं नुकसान झालं. पण, त्यानंतरही सरकारने दिलासा देण्यासाठी काही केलं नाही. कोरोना काळात इतर देशांमध्ये व्यवसायांना व्यावसायिकांना मदत करण्यासाठी पावलं उचलली गेली. मात्र, देशात असं काही झालं नाही.

मी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहे. जॅाब स्कॅम पाहिला, नोकरभरती परीक्षांसाठी घोटाळे होतायत. महिलांना राजकारणात आणण्यासाठी मी प्रयत्न करतेय. उत्तर प्रदेशात आम्ही ४० टक्के महिलांना निवडणूक तिकीट देतोय. भाजपच्या लोकांची ९०% भाषणं नेगेटिव्ह असल्याची टीकाही प्रियांका गांधींनी केली.

येत्या काळात महिला देशाचे चित्र बदलतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना प्रियांका म्हणाल्या, माझ्या आज्जीने देशातला एकमेव ओपिनीयन पोल घेतला. गोवा महाराष्ट्रात रहायला हवं का नाही यासाठी मतदान घेतलं. आज आम्ही तसंच पुन्हा गोवा गोवेकरांना परत देण्यासाठी प्रयत्न करतोय. भाजप साठी गोवा फक्त त्यांची हाव पुर्ण करण्यासाठी आहे. त्यांना आणि त्यांच्या उद्योजक मित्रांचा फायदा करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी भाजपवर केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT