“Prince, the boy who survived a 50-hour borewell ordeal in 2006, now seen as a young man as his story resurfaces.” saam tv
देश विदेश

बोअरवेलफेम 50 तास मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्स झाला 25 वर्षांचा

Prince Borewell Rescue: 2006मध्ये बोअरवेलमध्ये पडल्यानं 50 तास मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्स नावाचा मुलगा तुम्हाला आठवतोय का? कुरूक्षेत्रमध्ये घडलेली ही घटना आता पुन्हा चर्चेत आलीय... या चर्चेमागे नेमकी कारणं काय आहेत? प्रिन्स आता काय करतो?

Omkar Sonawane

सोशल मीडियावर सध्या या तरुणाची जोरदार चर्चा सुरु आहे... खुद्द खासदार नवीन जिंदालही या तरुणाला जाऊन भेटलेत...मात्र या भेटीमागचं कारण काय आहे... 21 जुलै 2006... सांयकाळी 6 वाजलेले.. कुरुक्षेत्रमधील हलदेरी गावात खेळता खेळता चार वर्षांच्या प्रिन्सनं किराणा मालाच्या दुकानातून उंदराला बाहेर येताना पाहिलं..आणि उंदराला पकडण्यासाठी प्रिन्स त्याच्या मागे धावला...

मात्र प्रिन्सची हीच उत्सुकता त्याच्यासाठी जीवघेणी ठरली...सिमेंटच्या गोणीमागे गेलेल्या उंदाराला पकडण्यासाठी गोणीवर चढलेला प्रिन्स थेट गोणीखालील 60 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला...आणि त्यानंतर सुरू झाली ती मृत्यूशी झुंज...तब्बल 50 तास प्रिन्स झुंज देत होता आणि अवघा देश प्रार्थना करत, श्वास रोखून भारतीय लष्कराचं रेस्क्यू ऑपरेशन पाहात होता...आणि प्रिन्स सुखरूप बाहेर आल्यानंतर आनंदला होता..

आता हाच प्रिन्स 24 वर्षांचा झालाय... एका पोलो मॅच दरम्यान खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांची प्रिन्ससोबत भेट झाली...

कुरुक्षेत्रमधील ते रेस्क्यू ऑपरेशन सर्वात मोठे आणि यशस्वी ऑपरेशन मानले जाते...या घटनेनंतर देशात बोअरवेल सुरक्षेबाबत कडक नियम लागू करण्यात आल्या..मात्र त्यानंतरही देशात अनेक ठिकाणी बोअरवेलमध्ये लहान मुलं अडकल्याच्या घटना घ़डल्या...

2009 ते 2019 या दहा वर्षांच्या काळात देशभरात सुमारे 40 हून अधिक मुलांचा बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झालाय... त्यामुळे 20 वर्षांनंतर समोर आलेल्या प्रिन्समुळे पुन्हा एकदा बोअरवेलमुळे निर्माण झालेला मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT