संसदेच्या सुरक्षा मुद्द्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी चांगलाच गोंधळ घातला. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
या निलंबित खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी दोघांमध्ये खासदारांच्या निलंबनाबाबत सविस्तर चर्चा झाली. संसदेत तसेच संसदेच्या बाहेर खासदारांनी केलेल्या कृत्याबाबत नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक कार्यालयात आणि संसदेत अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, अशी खंत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी फोनवरुन व्यक्त केली.
काही लोकांच्या अशा कृत्याने मला माझे कर्तव्य पार पाडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्या संविधानात दिलेल्या तत्त्वांचे पालन करण्यापासून मला रोखता येणार नाही, असं देखील मोदी यांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांना फोनवरून सांगितल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर गेल्या २० वर्षांपासून मी असा अपमान सहन करीत आहे. कोणताही अपमान मला माझ्या कामाचा मार्ग बदलण्यास प्रवृत्त करू शकत नाही, अशा भावना देखील मोदींनी उपराष्ट्रपतींकडे व्यक्त केल्या आहेत. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर राज्यसभेच्या सभापतींची नक्कल केली होती. यावर देखील मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे निलंबित केलेल्या १४१ खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात निलंबित खासदारांना संसद भवन, लॉबी आणि गॅलरीमध्ये येण्यापासून बंदी आहे, असं सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.