Prime Minister Narendra Modi in Deoghar Jharkhand  SAAM TV
देश विदेश

शॉर्टकटच्या राजकारणापासून सावध राहा, त्यापासूनच शॉर्ट सर्किट होतं: PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

Nandkumar Joshi

रांची: झारखंडमधील देवघरमध्ये बाबा बैद्यनाथचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीला संबोधित केले. देवघरमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी आधुनिक सुविधा देण्यात येत आहेत. जनतेच्या पैशांचा योग्य वापर होत आहे, असे मोदी म्हणाले.

देवघरची दिवाळी संपूर्ण देश बघत होता. जेव्हा विकासाची गंगा वाहते तेव्हा सर्वांनाच किती आनंद होतो याचा संदेश काल तुम्ही दीपक प्रज्वलित करून संपूर्ण देशाला दिला, असे मोदी म्हणाले. झारखंडच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या योजनाही बाबा आणि येथील जनतेच्या चरणी अर्पण केल्या, असंही मोदी म्हणाले. (Prime Minister Narendra Modi in Deoghar Jharkhand)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, देवघरमध्ये विकासगंगा वाहतेय. जनतेने शॉर्टकटच्या राजकारणापासून सावध राहावे, त्यामुळेच शॉर्टसर्किट होतं. मागील सरकारांवर यावेळी मोदींनी हल्लाबोल केला. झारखंडचा विकास यापूर्वीच व्हायला हवा होता. राज्याचा झालेला विकास हा भाजपच्या हेतूचे प्रमाण आहे. विकासाच्या शर्यतीत मागे राहणाऱ्या लोकांना पुढे आणण्यासाठी कष्ट उपसले जात आहेत, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी जेएमएम-काँग्रेस (Congress) सरकारवर टीकास्त्र सोडले. काही पक्षांमध्ये सेवाभाव वृत्तीपेक्षा सत्ताभाव आहे. ज्यांच्या मनात सत्ताभाव आहे, ते विकास करू शकत नाहीत. मात्र, भाजपच्या केंद्र सरकारने आरोग्य सुविधा उत्तम करण्याचे काम केले, असे मोदी म्हणाले. यावेळी देवघरमध्ये एम्सचे उद्घाटन केले.

सबका साथ आणि सबका विकास ही केवळ घोषणा नाही- मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, झारखंडमधील १२ लाख गरीब कुटुंबांना पक्की घरे दिली. विकासाच्या शर्यतीत मागे पडलेल्या भागांना पुढे आणले जात आहे. गावागावात पक्के रस्ते करण्यात येत आहेत. सबका साथ सबका विकास हा केवळ नारा नाही.

जेएमएम-काँग्रेस सरकारवर यावेळी त्यांनी निशाणा साधला. सत्ताभाव असलेल्यांचे प्राधान्य कधीही सेवाभाव असू शकत नाही. केंद्राने झारखंडमधील गरीब कुटुंबांना आयुष्मान योजना दिली. प्रत्येक गरीब कुटुंबाच्या स्वयंपाकघरात गॅस पोहोचवण्याचे काम केले. झारखंडला केंद्राची मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT