French President Emmanuel Macron: गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीला (UAE) रवाना झाले. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेतली. मोदींना निरोप देताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या फोनमध्ये एक सेल्फी कैद केला आहे. (Latest Marathi News)
त्यांच्या या सेल्फीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो पोस्ट करत फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॅप्शन लिहिलं आहे.
फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि फ्रान्समधील ही मैत्री अशीच कायम राहो. त्यांनी हेच वाक्या फ्रान्स आणि इंग्रजीमध्येही लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर असताना येथे त्यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं. ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्याता आला आहे.
‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मानीत होणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान केला आहे. ‘एलिसी पॅलेस’ येथे गुरुवारी हा सन्मान सोहळा संपन्ना झाला.
'या' पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
ब्रिटिश राजे चार्ल्स, दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुत्रोस घाली आदी मान्यवरांना देखील हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
मोदी दोन दिवसांपूर्वी गुरुवारी फ्रान्स दाखल झाले. फ्रान्समध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी फ्रान्स राष्ट्रीय दिन ‘बॅस्टिल डे’ च्या समारंभासाठी अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनाही अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. या समारंभावेळी हवाई दलाच्या विमानांसह तिन्ही सशस्त्र पथके यावेळी सहभागी झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.