Supriya Sule Saam Tv
देश विदेश

Supriya Sule: मोदीजी हे बरे नव्हे आणि लक्षात ठेवा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये पंतप्रधानांनी अंतर आणणं हे दुर्दैवी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच कोविड काळात काँग्रेस चुकीच्या पद्धतीने वागल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला असे ते यावेळी म्हणाले आहेत. (Prime Minister Maharashtra state Supriya Sule)

हे काँग्रेसच्या सरकारने केल्याने कोरोनाला हातभार लागल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसने ऐन कोरोना काळात श्रमिक ट्रेन्स पाठवले आणि सुपर स्प्रेड वाढला अशी टीका मोदी यांनी यावेळी केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि अन्य काही मंत्र्यांचा संदर्भ दिला आहे.

हे देखील पहा-

तसेच मंत्र्यांचे पत्रचं समोर ठेवून मोदींच्या वक्तव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्राचा देखील संदर्भ दिला आहे. देशात सर्वाधिक ट्रेन्स या राज्यांतून गेल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स गुजरातमधून गेल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून ८१७ ट्रेन्स आणि गुजरातमधून १०३३ ट्रेन्स तर पंजाब ४३० ट्रेन्स (Prime Minister Maharashtra state Supriya Sule)

काय सांगितले सुप्रिया सुळे?

का मोदी महाराष्ट्राबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. मोदींच्या वक्तव्याला शास्त्रीय आधार नाही. कोरोना कुणी पसरवला याचं आत्मचिंतन व्हावं. पंतप्रधानांचे भाषण आम्ही अपेक्षेने बघत होतो. मला प्रचंड वेदना झाल्या. ज्या राज्याने भाजपला १८ खासदार दिले आहेत. त्या महाराष्ट्राने फूल ना फुलाची पाकळी दिली. त्याबद्दल मोदी असं कसं म्हणू शकले?

पंतप्रधान एका पक्षाच्या वतीने बोलतात हे बघून मला दुख होतं आहे. पंतप्रधान देशाचे असतात. मात्र, हे महाराष्ट्राचं योगदान विसरत आहेत. महाराष्ट्रातील मुलगी आणि खासदार म्हणून पंतप्रधान प्रश्न विचारते का? महारष्ट्राबद्दल असे का बोलले. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर नेत आहे त्यात काय आनंद मिळतो.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT