Presidential Election 2022 News updates, Draupadi Murmu News
Presidential Election 2022 News updates, Draupadi Murmu News Saam Tv
देश विदेश

पाठिंबा द्या!, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मूंचे सोनिया, शरद पवार, ममता बॅनर्जींना आवाहन

वृत्तसंस्था

Presidential Election 2022: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर बोलून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ममता बॅनर्जी यांनी द्रौपदी मुर्मूला (Draupadi Murmu) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षात चर्चा करणार असल्याचेही सांगितले. (Presidential Election 2022 News updates)

ममता बॅनर्जींव्यतिरिक्त, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी या सर्व मोठ्या पक्षांचा पाठिंबा मागितला आहे.

हे देखील पाहा -

द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संसद भवनात पोहोचल्या त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. त्यांनी 4 सेटमध्ये उमेदवारी दाखल केली. पंतप्रधान मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार उपस्थित होते.

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही द्रौपदी मुर्मूच्या नामांकनात सहभाग घेतला. यावेळी एनडीएची एकजूटही पाहायला मिळाली. उमेदवारी अर्जावेळी जेडीयू, बीजेडीचे नेते उपस्थित होते. याशिवाय जगन मोहन रेड्डी यांच्या पक्ष वायएसआर काँग्रेसचे नेतेही अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले.

कोण आहे द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशाच्या आदिवासी जिल्ह्यातील मयूरभंजच्या रायरंगपूर गावात झाला. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालही होत्या. 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

SCROLL FOR NEXT