Afganistan | आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि हिशेब चुकता करु - राष्ट्रपती बायडेन Saam Tv News
देश विदेश

Afganistan | आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि हिशेब चुकता करु - राष्ट्रपती बायडेन

गुरुवारी काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. दहशतवादी संघटना आयसिसने हा स्फोट घडवला असल्याची माहिती आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेकडून बचाव मोहिम सुरु आहे. राजधानी काबुलमधील हमीद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने या विमामतळाचा ताबा घेतला असून अमेरिकन नागरिकांह अनेकांना रेस्क्यु केले जात आहे. अशातच गुरुवारी या विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. दहशतवादी संघटना आयसिसने हा स्फोट घडवला असल्याची माहिती आहे. या स्फोटात ६० नागरिकांसह १३ अमेरिकन कर्मचारी मारले गेले आहेत, १४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन संतापले असून त्यांनी हिशेब चुकता करु असा इशारा दिला आहे. (president joe biden wants to ISIS for kabul blast)

हे देखील पहा -

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरवातीला मौन बाळगून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यात आली आणि एक दिवसासाठी अमेरिकी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. पत्रकार परिषदेत बायडेन म्हणाले की, “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये बचाव कार्यात खूप अडथळे येत आहेत. विमानतळावरील हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणात्सव सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं विमानतळावर जमले आहे. विमानतळावर अन्न आणि पाण्याचाही तुटवटा जाणवतोय. त्यात तालिबानने ३१ ऑगस्टपर्यंत देश सोडण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे. मात्र गरज पडल्यास ३१ ऑगस्टनंतरही बचाव मोहिम सुरुच राहील असं बायडेन म्हणाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT