Prashant Kishor Saam Tv
देश विदेश

Prashant Kishor On Election: लोकसभा निकालाची भविष्यवाणी ठरली फोल; चूक मान्य करत प्रशांत किशोर यांनी केली मोठी घोषणा

Satish Kengar

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीचे भाकीत करण्यात मोठी चूक केल्याचे मान्य केले आहे. मतदानआधीच अंदाज बांधण्यात झालेल्या चुकीसाठी माफी मागण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आता भविष्यात अशी चूक करणार नाही आणि निवडणुकीतील जागांचे भाकीतही करणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर असं म्हणाले आहेत.

या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, "होय, मी आणि माझ्यासारख्या पोलस्टर्सची चूक झाली आहे. आम्ही याबद्दल माफी मागायला तयार आहोत." आगामी निवडणुकांबाबतही ते असेच भाकीत करत राहतील का, असे विचारले असता ते म्हणाले की, "नाही, निवडणुकीतील जागांच्या संख्येबाबत मी आता कोणतेही भाकीत करणार नाही."

प्रशांत किशोर यांनी काय केलं होतं भाकीत?

पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर प्रशांत किशोर यांनी भाकीत केले होते की, सध्याच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप 2019 प्रमाणे कामगिरी करेल आणि सुमारे 300 जागा जिंकेल. पण त्यांचा अंदाज खरा ठरला नाही. भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या, तर संपूर्ण एनडीएला 293 जागांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात ओळखले जातात. त्यांनी अनेक निवडणुकांबाबत भाकीत केले होते, जे बऱ्याच अंशी खरे ठरले आहेत., यावेळी देखील प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले होते. या निवडणुकीबाबत भाकिते करून ते संपूर्ण देशाच्या चर्चेत आले. मात्र त्यांचं हे भाकीत फोल ठरलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

Crime News: थरारक... अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

Budh Gochar 2024: 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह करणार गोचर; अडचणी दूर होऊन 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

IND vs NZ: आऊट असूनही अंपायरने नॉटआऊट दिलं; अंपायरच्या निर्णयावर Harmanpreet भडकली! नेमकं काय घडलं?

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT