बंगळूरु : भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती आणि रिपलिंगचे कंपनीचे संस्थापक प्रसन्न शंकर सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. १० अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक असलेले प्रसन्न शंकर यांना पत्नीकडून धोका मिळालाय. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत आणि मुलाला जबरदत्तीने अमेरिकेत नेलं असल्याचंही प्रसन्न शंकर यांनी म्हटलंय. यानंतर त्यांच्या पत्नीनेही आपली बाजू मांडली आहे. मला काहीच कल्पना नाही की काय सुरु आहे. मी खूप घाबरले आहे. मला काय करावं हे समजत नाही, असं दिव्याने म्हटलं आहे.
कोण आहेत प्रसन्न शंकर?
प्रसन्न शंकर उर्फ प्रसन्ना शंकरनारायणन सध्या सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. एक अत्यंत कुशल स्पर्धात्मक प्रोग्रामर, प्रसन्न यांना महाविद्यालयीन काळात भारतातील टॉप कोडर म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यांनी टॉपकोडर आणि गुगल कोड जॅम सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) त्रिचीचे माजी विद्यार्थी असलेल्या त्यांनी २००४ ते २००८ दरम्यान संगणक शास्त्रात बॅचलर पदवी मिळवली, जिथे त्यांची पत्नी दिव्या शशिधर हिच्यासोबत भेट झाली.
प्रसन्न यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केलं व नंतर लाईक अलिटल या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली. नंतर रिपलिंगची सह-स्थापना करण्यापूर्वी जेनेफिट्स या HR सॉफ्टवेअर कंपनीत अभियांत्रिकी संचालक बनले. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २०२० मध्ये रिपलिंग सोडले आणि २०२३ मध्ये सिंगापूर-स्थित क्रिप्टो-केंद्रित सोशल नेटवर्क, ०xPPL, लाँच केले.
दरम्यान, प्रसन्न शंकर यांची पत्नी दिव्याने पुढे म्हणाली की, प्रसन्नच नाही, तर त्याचे वडिलही अनेक लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. त्याच्या वडिलांनी अनेक लैंगिक गुन्हे केले, आपल्या पत्नीला मारहाण केली आणि तिला घराबाहेर काढले, असा आरोप दिव्याने केला. मला न्याय हवा आहे. माझा मुलगा कुठे आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी दिव्याने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.