Pranab Mukherjee yandex
देश विदेश

Pranab Mukherjee: सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जींना पीएम होऊ दिलं नाही? शर्मिष्ठा मुखर्जींचा गौप्यस्फोट

Sharmistha Mukherjee : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी आपल्या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केलाय. सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जींना पंतप्रधान होऊ दिलं नाही, असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकात केलाय.

Bharat Jadhav

Sharmistha Mukherjee Told About Pranab Mukherjee PM Post:

दिवगंत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी ह्यांनी 'प्रणव माय फायद – ए डॉटर रिमेम्बर्स' नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक माजी राष्ट्रपती आणि आजीवन काँग्रेशी या डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टींवर आधारित आहे. शर्मिष्ठा यांनी लिहिलेल्या पुस्तकातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. (Latest News)

दरम्यान शर्मिष्ठा ह्यांनी या पुस्तकात अनेक घटनांचा उल्लेख केलाय. त्यातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे प्रणव मुखर्जी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होतं. त्यावेळी त्यांच्या हातातून संधी कशी हिरावल्या गेली याची माहिती त्यांनी लिहिलीय. ज्यावेळी सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जींचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून हटवलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावेळी शर्मिष्ठा यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. त्या प्रसंगाचं वर्णन शर्मिष्ठा ह्यांनी या पुस्तकात केलाय. प्रणव मुखर्जींशी बोलताना शर्मिष्ठा यांनी त्यांना पंतप्रधानपदाविषयी विचारलं होतं. त्यावेळी प्रणव मुखर्जी यांचे उत्तर हे नही होतं, सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही, असं प्रणव मुखर्जींनी सांगितल्याचं शर्मिष्ठा यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय.

दरम्यान शर्मिष्ठा यांनी लिहिलेलं पुस्तक ज्या डायरीवरून लिहिलं आहे त्या डायरीचं नाव 'प्रणव माय फायद – ए डॉटर रिमेम्बर्स' आहे. प्रणव मुखर्जी हे १९६० पासून डायरी लिहित होते. एक नेता म्हणून काही काळ काम केलेल्या शर्मिष्ठा यांच्या म्हणण्यानुसार, हे पुस्तक प्रणव मुखर्जी यांच्या डायरीतील नोंदी आणि गेल्या काही वर्षांतील विविध मुद्द्यांवर तिच्याशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT