Pramod Sawant becomes Goa CM  Twitter/@ANI
देश विदेश

Goa: "मी प्रमोद सावंत, शपथ घेतो की..." - सावंत दुसऱ्यांदा बनले गोव्याचे मुख्यमंत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पणजी: देशाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आज (२८ मार्च, सोमवार) गोवा राज्यातही भाजपने सत्ता स्थापन केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सावंत यांना गोपनियतेची शपथ दिली. या शपथ ग्रहण सोहळ्याला (oath ceremony) पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Modi) उपस्थित होते. पणजीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम याठिकाणी हा शपथ ग्रहण समारोह होत आहे. (Pramod Sawant takes oath as Goa Chief Minister for the 2nd consecutive term)

सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. या सर्व मंत्र्यांचा आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सावंत हे लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतर मंत्री उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि मनोहर लाल खट्टर (हरियाणा), शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश), पुष्कर सिंग धामी (उत्तराखंड) यांच्यासह अनेक भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.

गोव्यात भाजपने ४० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. भाजपला तीन अपक्ष आणि दोन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) आमदारांचा पाठिंबा आहे. गोव्याच्या निवडणुकांची जबाबदारी ही महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली होती. फडणवीस हे गोवा निवडणुकीचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात गोव्यात भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT