Prajwal Revanna Saam Tv
देश विदेश

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांनी आई-वडिलांची मागितली माफी; 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच दिली माहिती

Prajwal Revanna Latest News : प्रज्वल रेवन्ना यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे आणि 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Satish Kengar

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएस लोकसभा खासदार प्रज्वल रेवन्ना हे लैंगिक छळ प्रकरणी 31 मे रोजी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर होणार आहेत. अनेक महिलांनी रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकात अनेक सेक्स टेप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये महिलांचा लैंगिक छळ करणारा व्यक्ती हे प्रज्वल असल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेवन्ना हे परदेशात पळून गेले होते.

यातच इंडिया टुडेशी बोलताना प्रज्वल रेवन्ना यांनी सांगितलं आहे की, मी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहणार आणि मी चौकशीत सहकार्य करीन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरील हे सर्व आरोप आहेत. माझा कायद्यावर विश्वास आहे.''

'मी माझ्या आई-वडिलांची माफी मागतो'

ते म्हणाले आहेत की, "मी माझ्या आई-वडिलांची माफी मागतो. मी डिप्रेशनमध्ये होतो. मी (भारतात परत) येईन आणि 31 मे रोजी एसआयटी समोर हजर होईल.'' देशातून पळून गेल्याच्या चार दिवसांनंतर रेवन्ना यांनी X वर एक पोस्ट केली होती. त्यात ते म्हणाले होते की, "मी बेंगळुरूमध्ये नाही... मी माझ्या वकिलामार्फत (पोलिसांशी) संवाद साधला आहे. लवकरच सत्याचा विजय होईल."

प्रज्वल रेवन्ना हे जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर 26 एप्रिल रेवन्ना यांनी देश सोडत जर्मनीत गेले होते. या प्रकरणी काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष जेडीएस आणि भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

दरम्यान, याच महिन्यात 4 मे रोजी बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर आता प्रज्वल रेवन्ना एसआयटी समोर हजर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवार स्पष्ट बोलले, भाजपच्या आरोपाला नेमकं काय दिले प्रत्युत्तर, पाहा

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

SCROLL FOR NEXT