Afghanistan Earthquake Kills 7 Saam
देश विदेश

भारताचा शेजारचा देश हादरला; भूकंपाच्या धक्क्यामुळे सगळंच उद्ध्वस्त, ७ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्यात अडकले

Afghanistan Earthquake Kills 7: उत्तर अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप झाला. मजार ए शरीफ शहराजवळ भूकंपाचे केंद्र. ७ जणांचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • उत्तर अफगाणिस्तानमध्ये भूकंप.

  • मजार ए शरीफ भूंकपाचे केंद्र.

  • भूकंपामुळे ७ जणांचा मृत्यू.

अफगाणिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यानंतर आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केल भूंकपाचे हादरे बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १०० हून अधिक लोक जखमी आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठील हलवण्यात आलं आहे. भूकंपानंतर (USGS)ने त्यांच्या पेजर सिस्टमद्वारे या भागांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भूकंपामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यूएसजीएसनुसार, भूंकपाचे मुख्य केंद्र उत्तर अफगाणिस्तानातील मजार ए शरीफ शहरापासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आणि शेजारील देशांमध्ये जाणवले. भूकंपाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. या व्हिडिओत अफगाणिस्तानमधील भयावह परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

कोसळेल्या इमारती, ढिगाऱ्यात अडकलेली लोक, मदतकार्यात गुंतलेले स्थानिक लोक यात दिसून येत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढिगाऱ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव पथके अथक परिश्रम घेत आहेत. अनेक भागांत संपर्क तुटला होता. मदत कार्यातही अडथळा निर्माण झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी दक्षिण पूर्व अफगाणिस्तानमध्ये ४.९ तीव्र रिश्टर स्केल भूकंप आला होता. तर, ३१ ऑगस्टमध्येही देशाच्या पूर्व भागातील काही ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवले होते. ज्यामध्ये २,२००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे अफगाणिस्तानमधील काही भाग हादरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं? काळजी नको! घरबसल्या मोबाईलवरून काढा दुसरं कार्ड

Easy Hairstyles : रोजच्या पोनीटेलचा कंटाळा आलाय? ऑफिससाठी ट्राय करा ५ मिनिटांत होणाऱ्या ५ हेअरस्टाईल

सांगली हादरली! आधी एकजण खाली उतरला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला, अन् पाहता पाहता तिघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?

ACB Action: जिल्हा परिषदेच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

SCROLL FOR NEXT