Arrest Saam Tv
देश विदेश

पाेस्टमास्तरने खेळला सव्वा काेटी रुपयांचा सट्टा; ठेवीदार अडचणीत, पाेलीस तपास सुरु

आयपीएल सट्टेबाजीवर ठेवीदारांचे पैसे खर्च केल्याच्या प्रकरणात पाेस्ट मास्तर अटकेत.

साम न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेश : आयपीएल सट्टेबाजीवर ठेवीदारांचे काेट्यावधी रुपये खर्च केल्याप्रकरणी एका पाेस्टमास्तरला (postmaster) पाेलीसांनी (police) अटक (arrest) केली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर पाेस्ट मास्तरच्या पत्नीने नऊ लाख रुपये टपाल कार्यालयात जमा केल्याची पाेलीसांनी स्पष्ट केले. (ipl latest marathi news)

हा प्रकार मध्य प्रदेशातील (madhya pradesh) सागर (Sagar) जिल्ह्यातील एका टपाल कार्यलयात घडला आहे. काही लोक त्यांच्या मुदत ठेवीची (एफडी) रक्कम मिळत नसल्याने टपाल कार्यालयात सातत्याने चाैकशी करीत हाेते. अखेर त्यांना दहा ते १२ दिवसांनी टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे मुदत ठेव क्रमांक आणि खाते क्रमांक नाेंदीत आढळत नसल्याचे सांगितले. त्यावेळी संबंधित ठेवीदारांना धक्का बसला.

या प्रकरणी पाेस्टमास्तर विशाल अहिरवार (Vishal Ahirwar) यास टपाल खात्याने निलंबित केले असून ठेवीदारांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यास नुकतीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान ठेवीदारांचे पैसे आयपीएल बेटिंगसाठी (ipl 2022) वापरल्याचे अहिरवारने कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणानंतर ठेवीदार अडचणीत आले आहे. काेराेना काळात काहींचे नातेवाईक गेल्यानंतर त्यांनी टपाल खात्यात त्यांच्या मुला बाळांसाठी मुदतठेव ठेवल्या हाेत्या. तसेच एका या वृद्ध महिलेने आपल्या चार मुलींच्या लग्नासाठी निधीची व्यवस्था करण्यासाठी टपाल खात्यात पाच लाख रुपयांची मुदतठेव ठेवली हाेती. परंतु विशालच्या कृत्यामुळे आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही, असे पाेलीस अधिका-याने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT