Poonch Attack/ANI SAAM TV
देश विदेश

Poonch Attack: पुंछमधील दहशतवादी हल्ल्यामागील धक्कादायक सत्य उघड; 'कंगाल' झालेल्या पाकिस्ताननेच...

Poonch Attack : जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये शिजल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

Poonch Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये शिजल्याचे सांगण्यात येत आहे.

एका हिंदी वृत्तसंकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ सरकारने पाकिस्तानमधील निवडणुका स्थगित करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला. त्यांच्या सरकारचे सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या साथीने या हल्ल्याचा कट रचला गेला. काश्मीरमध्ये आणखी हल्ले घडवून आणण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी सरकारने कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. भारताचे मे महिन्यात पाकिस्तानसोबतचे संबंध तणावाचे असतील आणि ऑक्टोबरमध्ये तो तणाव निवळेल, असे पाकिस्तानी सरकारने कोर्टात सांगितले होते. श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-२० देशांच्या पर्यटन प्रतिनिधींच्या कार्यकारी समूहाच्या बैठकीमुळे पाकिस्तानचा जळफळाट झालाय. ही बैठक २२ ते २४ मे दरम्यान होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ २७ ते २९ एप्रिल दरम्यान भारतात एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तर परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे मे महिन्यात गोव्यात एससीओ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

पाकिस्तान एससीओच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय हा या कटाचा भाग असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तान या व्यासपीठाचा वापर जगाला काश्मीरमधील अशांतता दाखवण्यासाठी करणार आहे. त्याआधीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणे हा या कटाचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी हल्ल्यात ५ भारतीय जवान शहीद

दहशतवाद्यांनी पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला चढवला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर राजौरी आणि पुंछमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर नजर ठेवली जात आहे.

या हल्ल्यात चार दहशतवादी सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या बाटा-डोरियाचा परिसर सुरक्षा दलांनी घेरला आहे. हल्ल्याच्या चौकशीसाठी बॉम्बनाशक पथकही घटनास्थळी पोहोचले होते. दुसरीकडे या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT