BJP Leaders Attacked During Flood Relief Work Saam
देश विदेश

भाजप खासदार अन् आमदारावर प्राणघातक हल्ला; पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जात असताना भंयकर घडलं

BJP Leaders Attacked During Flood Relief Work: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये भाजप नेत्यांवर हल्ला. पूरग्रस्तांना मदत करताना ही घटना घडली.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम बंगालमध्ये भयंकर घडलं.

  • भाजप नेत्यांवर प्राणघातक हल्ला.

  • पूरग्रस्तांना मदत करताना स्थानिकांनी घेरलं.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप खासदार आणि आमदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही भाजप नेते पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. साहित्य वाटप करत असताना त्यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला. दरम्यान, भाजप आयटी विंगचे प्रमुख अमित मालवीय यांनी दावा केला की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित व्यक्ती या घटनेमागे आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना उत्तर बंगालमधील नागरकाटा येथे घडली. भाजप खासदार खगन मुर्मू आणि भाजप आमदार शंकर घोष यांच्यावर नागरिकांनी हल्ला केला. नागरकाटा येथे सध्या पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही नेते मंडळी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले.

भाजप खासदार खगेन मुर्मू देखील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. त्यांनी नागरकाटा येथे साहित्य वाटप केले. साहित्य वाटप करताना संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आमदार शंकर घोष यांच्यावरही हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भाजप आयटी विंगचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 'सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित व्यक्तीचा या घटनेमागे हात आहे', असा आरोप त्यांनी केला. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT