जगन मोहन रेड्डी यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला.
2024 लोकसभा निवडणुकीतील आंध्र गडबडीबद्दल मौन बाळगल्याचा दावा.
चंद्राबाबू नायडू यांच्या NDA मैत्रीमुळे मौन असल्याचे रेड्डींचे म्हणणे.
आरोपांमुळे राष्ट्रीय राजकारणात तापलेले वातावरण.
वायआरएस काँग्रेस पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. त्यांच्या या खुलासामुळे केंद्रातील सरकारमध्ये भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपावरून देशभरातील राजकारणात रान उठवलंय. पण त्याचदरम्यान जगन मोहन रेड्डी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोठा आरोप केलाय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आंध्र प्रदेशातही गडबडी झाली होती. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी त्यावर मौन बाळगून आहेत. राहुल गांधींच त्यावरून प्रश्न का करत नाही, यामागे काय कारण आहे. याचा खुलासाही रेड्डी यांनी केलाय. राहुल गांधी हे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भेटले आहेत. त्यामुळेच ते राज्यातील निवडणुकीत झालेल्या गडबडीचा मुद्दा उचलून धरत नाहीत. विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडू हे केंद्रातील एनडीए सरकारचे मित्र आहेत.
ताडेपल्ली येथील वायएसआरसीपीच्या केंद्रीय कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जगन मोहन रेड्डी यांनी दावा केला की, सुमारे ४८ लाख मतांमध्ये अनियमितता झाली आहे. हे राज्यातील एकूण मतांच्या सुमारे १२.५ टक्के आहे. पण "दुर्दैवाने राहुल गांधी आंध्र प्रदेशामधील या गडबडीवर काही बोलत नाहीत? ते बोलत नाहीत कारण त्यांचा चंद्राबाबू नायडू यांच्याशी थेट 'हॉटलाइन' संपर्क झालाय."
मतदान संपले आणि मतमोजणी झाली तेव्हा आंध्र प्रदेशातील मतदानाच्या टक्केवारीमधील फरक सर्वाधिक होता. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते माणिकम टागोर यांच्यावरही टीका केलीय. त्यांनी कधी तेलुगू देसम पक्षाविरोधात टिप्पणी केली का? असाही प्रश्न रेड्डी यांनी केलाय.
मुख्यमंत्री नायडू हे अनेक घोटाळ्यात अडकलेत. ते सहजपणे दिसत आहे. पण माणिकम टागोर हे त्यावर काही बोलत नाहीत. कारण चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राहुल गांधी यांच्यात हॉटलाइन कनेक्शन आहे. पुढे बोलताना जगन मोहन रेड्डी म्हणाले की, राज्यात बेल्ट शॉप बेकायदेशीर दारुचे दुकाने आहेत.
परमिट रूम, वाळू माफिया, असे अनेक घोटाळे होत आहेत. पण जर राहुल गांधी चंद्राबाबू नायडू यांना भेटले असतील तर केंद्रात काहीतरी मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींना केंद्रात पाठिंबा दिलाय. जर नायडू आणि राहुल गांधी यांच्यात काही डील झाली असेल तर केंद्रात मोठी उलटफेर होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.