Arvind Kejriwal  Yandex
देश विदेश

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका; खासगी सचिव बिभव कुमार बडतर्फ

Arvind Kejriwal News : आदेश जारी करण्यात आलाय. दिल्लीच्या दक्षता विभागाने हा आदेश जारी केला आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून बिभव कुमार यांची देखील अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Bibhav Kumar Terminated :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. दिल्लीच्या दक्षता विभागाने हा आदेश जारी केला आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून बिभव कुमार यांची देखील अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे.

एका कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी बिभव कुमार यांच्याविरुद्ध 2007 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बिभव कुमार यांची खासगी सचिवपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या सोमवारी ईडीकडून बिभव कुमार यांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती.

केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये आहेत. मात्र गेल्या २ दिवसांपासून त्यांना मोठे धक्के बसलेत. कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्या अडचणी वाढत असताना ही मोठी कारवाई मानली जात आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांना झालेली अटक योग्य असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं, तसेच याबाबतची याचिका फेटाळली.

त्यानंतर बुधवारी वकिलांना आठवड्यातून पाच वेळा भेटता यावे अशी याचिका केली होती, ही याचिका देखील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यावर त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. येथे तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र येथेही विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांच्याच सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता दिल्लीच्या दक्षता विभागाने बिभव कुमार यांना खासगी सचिव पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश दिलेत. या सर्व घडामोडींमुळे केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT