Guest House Raid : बिहारची राजधानी पाटण्यातील एका प्रसिद्ध गेस्ट हाऊसवर पोलिसांनी अचानक छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी तेथून चार मुली आणि एका मुलाला संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेतले आहे. गेस्ट हाऊसमधील एका खोलीत हे तरुण-तरुणी जमले होते. पोलिसांची धाड पडताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि तेथे उपस्थितांची प्रचंड धांदल उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या गेस्ट हाऊसमध्ये अवैध देहव्यापार (सेक्स रॅकेट) सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून गेस्ट हाऊसच्या त्या ठराविक खोलीवर छापा टाकला. पोलीस रुममध्ये पोहोचले असता तेथे ४ मुली आणि १ मुलगा आक्षेपार्ह स्थितीत आढळले. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह साहित्य आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.
या कारवाईमुळे हॉटेल आणि गेस्ट हाऊस चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी गेस्ट हाऊस्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. या कारवाईची माहिती मिळताच, गेस्टहाऊसचा मालक आणि काही कर्मचारी मागच्या दाराने पळून गेले. या रॅकेटमागे नक्की कोण आहे? गेस्ट हाऊस मालकाची यामध्ये काय भूमिका आहे? याचा पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसमधून काही गुन्हेगारी स्वरूपाचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या साहित्याची तपासणी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुढील पुरावेही गोळा करत आहेत. छाप्यादरम्यान गेस्ट हाऊसचा मालक आणि कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत.
गेस्ट हाऊसमध्ये हा कथित प्रकार किती काळापासून सुरू होता आणि त्यात किती लोक सामील होते? याचा पोलीस तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्यांची सध्या चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.