Shraddha case  Saam TV
देश विदेश

श्रद्धाची निर्घृण हत्या करून त्याचे ३५ तुकडे कसे केले? सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलीस आफताबच्या घरी

श्रद्धा हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस रविवारी पुन्हा एकदा आरोपी आफताबच्या घरी पोहोचले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवला आहे. या संदर्भात पोलिसांचे (Police) पथक रविवारी आरोपी आफताबच्या घरी पोहोचले. आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे कसे केले, ते कुठे ठेवले, या संपूर्ण घटनेचा सीन रिक्रिएट तयार केले जाईल. त्याआधारे पोलीस हत्येशी संबंधित आणखी अनेक पुरावे गोळा करणार आहेत.

19 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पुरावे गोळा करण्यासाठी सलग सहाव्या दिवशी मेहरौलीच्या जंगलात शोध घेतला. याशिवाय दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र राहुल आणि गॉडविन यांचीही चौकशी केली. त्याचवेळी पोलिसांनी दुसऱ्यांदा गुरुग्राम गाठून शोधमोहीम राबवली.

आफताबच्या घराबाहेर गर्दी

दिल्ली पोलीस चौकशीसाठी आफताबच्या घरी पोहोचले आहेत. त्याचवेळी त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी होऊ लागली आहे. हत्येची घटना प्रकाशझोतात आल्यापासून लोक इथे रील बनवण्यासाठी येऊ लागले आहेत. खबरदारी म्हणून त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात गुंतलेल्या दिल्ली पोलिसांना आफताबचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हे फुटेज १८ ऑक्टोबरचे असले तरी. यामध्ये आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे. आफताब 18 ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या विकृत मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब तीन वेळा ये-जा करताना दिसत आहे.

पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे कपडे जप्त केले

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरात असलेले सर्व कपडे ताब्यात घेतले आहेत. यातील बहुतांश कपडे आफताबचे आहेत. याशिवाय पोलिसांना तेथून श्रद्धाचे कपडेही मिळाले आहेत. दोघांचेही कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, कारण आतापर्यंत त्याने हत्येच्या दिवशी घातलेले कपडे आणि श्रद्धाने घातलेले कपडे पोलिसांनी जप्त केलेले नाहीत. घरातून जप्त केलेल्या कपड्यांवरून नक्कीच काही सुगावा लागतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे 13 तुकडे मिळाले आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही, तसेच तिचा मोबाईलही सापडलेले नाही.

काय आहे श्रद्धा खून प्रकरण?

मुंबईतील शेफ आणि फोटोग्राफर आफताब पूनावाला याने दिल्लीत त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वलकरची हत्या केली होती. 18 मे रोजी त्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात घरात सुमारे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे जंगलात फेकून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT