Narendra Modi Property Saam TV
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती जाहीर, वर्षभरात २६ लाखांची वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?

मोदींकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्या अंगठ्यांची किमंत १.७३ लाख रुपये इतकी आहे.

Jagdish Patil

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संपत्तीची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. कार्यालयाने जाहीर केलेल्या मोहितीनुसार वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये २६ लाख रुपयांची वाढ झाली असून आता त्यांची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०२ रुपये इतकी आहे.

मात्र, २.२३ कोटीच्या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर अशा मालमत्तेचा समावेश नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. मोदी यांच्या जवळ असणाळ्या २.२३ कोटी रुपयांपैकी अधिकची संपत्ती ही बँक डिपॉझिट (Bank Deposit) स्वरुपात आहे. मोदी यांच्याकडे स्थावर मालमत्तेचा समावेश नसला तरी त्यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्या अंगठ्यांची किमंत १ लाख ७३ हजार इतकी आहे.

पाहा व्हिडीओ -

आज पंतप्रधान कार्यालयाने (PMO) नरेंद्र मोदी यांची ३१ मार्चपर्यंतची संपत्ती जाहीर केली. कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मोदी यांचे कोणतेही बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही. शिवाय मोदी हे गुजरातचे (Gujrat) मुख्यमंत्री असताना त्यांनी गांधीनगरमध्ये जमिनीची खरेदी केली होती. मात्र ती जमिनसुद्धा मोदी यांनी दान केल्याचं सांगण्यात आलं आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ३५,२५० रुपये इतकी रक्कम कॅशमध्ये असून पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावावर ९,०५,१०५ रुपये डिपॉझिट आहे. पंतप्रधानांकडे १,८९,३०५ रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे. शिवाय पंतप्रधानांकडे स्वत:च्या मालकीचे वाहन देखील नसल्याची माहितीही समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT