PM Narendra Modi whatsapp channel 10 lakh followers in just 24 hours of launching  Saam TV
देश विदेश

PM Modi News: PM मोदींची WhatsApp वरही हवा! चॅनल सुरू होताच वाढले लाखो फॉलोअर्स

Satish Daud

PM Narendra Modi Whatsapp Channel

व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅनल’ हे नवीन फीचर्स लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने अनेक राजकीय नेते सेलिब्रिटी चाहत्यांसोबत थेट जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केलं आहे. चॅनल सुरू होताच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत लाखोंची वाढ झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हॉट्सअॅप चॅनेलला बुधवारी संध्याकाळपर्यंत लाखो नागरिकांनी फॉलो केलं आहे. 24 तासांच्या आत पंतप्रधान मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनल फॉलोअर्सचा आकडा 10 लाखांच्या वर गेला आहे. येत्या काही दिवसात ही संख्या कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हॉट्सअॅप चॅनलवर फॉलो केलेल्या नागरिकांना पीएम मोदींशी संबंधित अपडेट्स आणि पोस्ट दिसणार आहेत. यामुळे तुम्ही पंतप्रधान मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट होऊ शकता. दरम्यान, मोदींना व्हॉट्सअॅप चॅनलवर नेमकं कसं फॉलो करायचं? जाणून घेऊया थोडक्यात.

पंतप्रधान मोदींना कसे फॉलो करणार?

पीएम मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. यानंतर Status च्या ऐवजी आता तुम्हाला Update चा पर्याय दिसेल. तुम्ही येथे क्लिक करताच, तुम्हाला चॅनेल दिसू लागतील. तुम्हाला Find Channels या पर्यायावर क्लिक करून नरेंद्र मोदी असे लिहावे लागेल.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर पीएम मोदींचे चॅनल दिसेल, ज्याला तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी तुम्हाला + बटण टॅप करावे लागेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय तुम्ही इतर राजकीय नेत्यांच्या व्हॉट्सअॅप चॅनलला देखील अशाच प्रकार फॉलो करु शकता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT