PM Modi Pune Visit  SAAM TV
देश विदेश

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर; व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे करणार उद्घाटन

PM Modi Visit to Gujarat: चौथी औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, टिकावू उत्पादने, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनव्यवस्था आणि शाश्वत ऊर्जा व शाश्वततेकडे वाटचाल अशा विषयांचा समावेश असेल.

Ruchika Jadhav

Gujarat News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करणार आहेत. गांधीनंगर येथे होणाऱ्या वायब्रंट गुजरात समिटमध्ये ते भाग घेणार असून याचे उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर दोन किलोमीटरचा रोड शो देखील यावेळी केला जाणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वायब्रट गुजरात समिटमध्ये 34 सहयोगी देशांचे प्रतिनिधी, 16 सहयोगी संघटन यासह 133 देशाचे व्यापारी आणि मंत्री उपस्थित असणार आहेत. व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची संकल्पना, 2003 साली, गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली होती.

व्यवसायिक सहकार्य, ज्ञानाचे आदानप्रदान आणि धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून, एकात्मिक वृद्धी व शाश्वत विकास साधण्यासाठीचे एक प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणून वायब्रट गुजरात समिट नावारूपाला आली आहे. दहावी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद, 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान गांधीनगर इथे होत असून या परिषदेची संकल्पना “ भविष्याचे प्रवेशद्वार” अशी आहे.

या वर्षीच्या शिखर परिषदेत 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्था सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालय, या मंचांचा वापर करून ईशान्य भारतात असलेल्या व्यावसायिकांना मोठी संधी मिळाणार आहे. या शिखर परिषदेदरम्यान चर्चासत्रे आणि परिसंवादांसह जागतिक दृष्ट्या महत्वाच्या विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत.

चौथी औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, टिकावू उत्पादने, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनव्यवस्था आणि शाश्वत ऊर्जा व शाश्वततेकडे वाटचाल अशा विषयांचा समावेश असेल. व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शोमध्ये विविध कंपन्या त्यांची जागतिक दर्जाची उत्तम कला आणि तंत्रज्ञान असलेली उत्पादने प्रदर्शित करतील. ई-मोबिलिटी, स्टार्ट अप्स, एमएसएमई, नील अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा अशा विषयांवर या ट्रेड शोमध्ये भर दिला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT