Narendra Modi saam tv
देश विदेश

PM Modi: काश्मीर फाइल्सवरून पंतप्रधान मोदींचे पक्षाच्या बैठकीत मोठं विधान

आज पक्षाची संसदीय बैठकीत मान्यवर नेत्यांची उपस्थिती आहे.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : द काश्मीर फाइल्सवरून (The Kashmir Files) सुरू असलेल्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) मोठे विधान केले आहे. सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मोदी यांनी मंगळवारी नमूद केले. भाजपच्या (BJP) संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले. (The Kashmir Files Latest Marathi News)

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आज दिल्लीतील (delhi) आंबेडकर भवनात झाली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही बैठकीत उपस्थिती हाेती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लता मंगेशकर, नवीन शेखरप्पा, युक्रेनमध्ये ठार झालेला भारतीय विद्यार्थी आणि कर्नाटकातील बजरंग दलाचा कार्यकर्ता (हिजाबच्या वादातून मारला गेलेला) हर्ष यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाेन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

यानंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील सर्वांचे आभार मानले. तसेच मार्गदर्शनपर भाषण केले. या भाषणात काश्मीर फाइल्स या चित्रपटावरुन सुरु असलेल्या गदाराेळावरुन त्यांनी काश्मीरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असे विधान केले. दरम्यान हा चित्रपट सर्वांनी जरुर पहा असेही माेदींनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांना केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT