PM Narendra Modi In Karnataka Saamtv
देश विदेश

Narendra Modi: 'कॉंग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे पण मी...' पंतप्रधानांचा कर्नाटकमधून हल्लाबोल

PM Modi In Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत, आगामी निवडणूकांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bangalore: कर्नाटकच्या निवडणूका जवळ येत असल्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी कर्नाटकातील 10-लेन बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे (Bengaluru-Mysuru Highway) उद्घाटन केले.

या प्रकल्पामध्ये राष्ट्रीय महामार्ग-275 च्या बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या सहा पदरी कामाचा समावेश आहे. 119 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

भाषणातून साधला कॉंग्रेसवर निशाणा...

या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आज कर्नाटकमधील जनतेने मला जे प्रेम दिले, त्याची व्याजासहित परतफेड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी,"काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही, अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला...

कॉंग्रेसने गरिबांना उद्धस्त केले...

'2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्याचेच काम केले. गरिबांचा हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील 2.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,' असा आरोप त्यांनी यावेळी केला..

दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर-कुशालनगर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदींनी केले. 92 किलोमीटर लांबीचा हा रस्ता प्रकल्प सुमारे 4,130 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT