
NCP Song In Russia: सध्या देशभरात होळीचा रंगपंचमीचा जल्लोश पाहायला मिळत आहे. होळीचा सण देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकजण धुमधडाक्यात होळीचं सेलिब्रेशन करत असतो. सध्या सोशल मीडियावर होळीमध्ये गाणी लावून धमाल करतानाचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये थेट रशियातील एका व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
या व्हायरल व्हिडिओ रशियामधील असून होळी साजरी करताना तरुणाई थेट राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर थिरकताना दिसत आहेत, ज्यामुळे या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य, चला जाणून घेवू.... (Latest Marathi News)
भारतात होळीचा जल्लोश आणि उत्साह किती असतो हे काळी वेगळे सांगायची गरज नाही. प्रत्येकासाठी होळी, धुलीवंदन, आणि रंगपंचमी हे सण धमाल करायला लावणारे असतात. भारतातला तरुण कुठेही असला तरी होळीचे सेलिब्रेशन करतोच. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही (Viral Video) रशियामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणांचा आहे.
सध्या अशाच महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांचा होळी सेलिब्रेशन दरम्यान राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वोल्गोग्राड राज्य वैद्यकीय विद्यापीठ, रशिया (Rasia) येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
वैद्यकिय शिक्षणासाठी देशातील तसेच महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी रशियात जातात. दरम्यान शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ होळी सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. यामध्ये डीजेच्या तालावर अनेक तरुण नाचताना दिसत आहेत. मात्र यावेळी वाजतंय ते गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. ज्ञानेश्वर अखाडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हायरल व्हिडिओमधील तरुण राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचं प्रचारगीत असलेल्या राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर तुफान नाचताना दिसत आहेत. रशिया येथे भारतीय विद्यार्थ्यांनी होळीच्या रंगात अजूनही रंग भरला... जेव्हा वाजलं रशियाच्या वैद्यकीय विद्यापीठात राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं..! असं सुंदर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान चर्चेत असून नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत... (Holi Festival 2023)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.