Vaibhav Naik: दोन महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार; वैभव नाईकांचा मोठा दावा, कारणही सांगितलं...

Political Naws: वैभव नाईक यांनी यावेळी नितेश राणेंवरही हल्लाबोल केला आहे.
MLA Vaibhav Naik , MP Narayan Rane
MLA Vaibhav Naik , MP Narayan Rane saam tv

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. नारायण राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचं भाकित वैभव नाईक यांनी केलं आहे. वैभव नाईक यांनी यावेळी नितेश राणेंवरही हल्लाबोल केला आहे.

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार आहे. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणेंचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. भाजपला राणेंची राजकीयदृष्ट्या गरज राहिलेली नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार, असल्याचा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. (Political News)

MLA Vaibhav Naik , MP Narayan Rane
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणार, फडणवीसांनी काय सांगितलं?

ईडी प्रकरणात विरोधकांना उपदेश देणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनाही वैभव नाईक यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आलेल्या ईडी नोटीसीनंतर पक्ष का बदलला हे वडिलांना विचारावं. त्यांनी असं काय कॉम्प्रमाईज केलं की त्यांची चौकशी थांबली हे त्यांनी जनतेला सांगावं. मग इतरांना उपदेश द्यावेत, अशी टीका वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com