PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi: काँग्रेस नसती तर शीखांची कत्तल झाली नसती, काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं - मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: काँग्रेस नसती तर शीखांची कत्तल झाली नसती, काश्मिरी पंडितांना पळून जावे लागले नसते, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर टिकास्त्र सोडलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Lok Sabha speech) यांनी उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला (PM Narendra Modi says if there was no Congress there would have been no emergency in Rajya Sabha Speech).

काँग्रेसने कुटुंबवादापुढे काहीही विचार केला नाही - मोदी

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, काही लोक 1947 देश निर्माण झाला असं मानतात. लोकशाही कुणाच्या मेहरबानीवर नाही. 1975 ला लोकशाही गळा घोटण्याचा काम केलं गेलं. भारत ही लोकशाहीची जननी आहे हे अभिमानाने सांगण्याची गरज होती. लोकशाही देशात वर्षानुवर्षे सुरु आहे. भारतात शतकानुशतके लोकशाही आणि वादविवाद सुरु आहेत.

काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांनी कुटुंबवादापुढे काहीही विचार केला नाही. भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका कुटुंबाभिमुख पक्षांपासून आहे, हे मानावे लागेल. यामध्ये पहिला धोका हा प्रतिभेला आहे.

काँग्रेस नसती तर आणीबाणी लागली नसती - मोदी

पुढे मोदी म्हणाले, काँग्रेस (Congress) नसती तर काय झाले असते, असे संसदेत सांगण्यात आले, मी उत्तर देतो. महात्मा गांधींचीही ही इच्छा होती. कारण त्यांना माहिती होतं की यांच्या राहण्याने काय काय होणार आहे. जर त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झालं असतं हे मी सांगतो -

- काँग्रेस नसती तर आज लोकशाही कुटुंबवादापासून मुक्त असाता, भारत परदेशी चष्म्यावर नाही तर स्वदेशी संकल्पावर चालत असता.

- काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक नसता.

- काँग्रेस नसती तर दशकांपर्यंत करप्शन नसते.

- काँग्रेस नसती तर जातिवाद आणि प्रादेशिकवाद यांच्यातील दरी इतकी खोल नसती.

- काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता, वर्षानुवर्षे पंजाब दहशतीखाली नसता.

- काँग्रेस नसती तर जम्मू-काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं.

- काँग्रेस नसती तर मुलींना तंदुरमध्ये जाळण्याच्या घटना घडल्या नसत्या.

- काँग्रेस नसती तर देशातील सामान्य नागरिकांना घर, रस्ते, वीज, पाणी, शोचालय या मुलभूत सुविधांसाठी इतकी वर्ष वाट पाहावी लागली नसती.

तुमची नवीन संकल्पना असेल तर काँग्रेसचं नाव बदला - मोदी

काँग्रेस नसती तर काय झालं असतं हे मी मोजत राहील, पण संपणार नाही. काँग्रेस जेव्हा सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही. आता जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत तेव्हा ते देशाच्या अडथळा निर्माण करत आहेत. आता काँग्रेसला राष्ट्र या संकल्पनेवरही आपत्ती आहे. राष्ट्र ही संकल्पना गैरसंविधानिक आहे, तर तुमच्या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष का ठेवलं आहे. जर तुमची नवीन संकल्पना असेल तर नाव बदला. आपल्या पुर्वजांची चूक सुधारा, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जहरी टीका केली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ माजला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT