PM Narendra Modi: कोरोना काळात 80 कोटी नागरिकांना मोफत राशन, गरिबांसाठी विक्रमी घरे : पंतप्रधान

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv

नवी दिल्ली: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Rajya Sabha speech) यांनी उत्तर दिलं. आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. याआधी पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेला संबोधित केले होते. यामध्ये पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तर आज पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या कामाचा पाढाच वाचला (PM Narendra Modi speech in rajya sabha).

गेल्या 100 वर्षांत इतके मोठे संकट पाहिले नाही

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या भाषणात सांगितले की, कोरोना ही जागतिक महामारी आहे आणि मानवजातीने गेल्या 100 वर्षांत इतके मोठे संकट पाहिले नाही. आताही हे संकट नव्या रूपात संकटे आणत आहे. संपूर्ण जग याला लढा देत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले की, आज जगभरात भारताच्या कार्याचे कौतुक होत आहे.

कोरोना ही जागतिक महामारी आहे. जगाने गेल्या 100 वर्षांत इतके गंभीर संकट पाहिले नाही. आज जेव्हा 130 कोटी भारतासाठी कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हा भारताचे काय होणार, ही चिंतेची बाब होती. पण आपल्या देशातील जनतेच्या संकल्पामुळेच आपल्या देशाचे जगभर कौतुक होत आहे. हे यश आपल्या देशवासीयांचे आहे.

कोरोनाच्या काळात पाच कोटी गरीब कुटुंबांना नळातून पाणी देण्याचे काम करण्यात आले. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी बंपर पीक घेतले आणि एमएसपीवर विक्रमी खरेदीही झाली.

पीएम मोदींनी आनंद शर्मा यांची खिल्ली उडवली

राज्यसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी आनंद शर्मा यांचे कौतुक करताना खिल्ली उडवली. काँग्रेसने दिलेल्या वेळेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वाधिक वेळ घेतल्याने आनंद शर्मा नाराज झाले होते, असं ते म्हणाले.

आमच्यासाठी राष्ट्र हा जिवंत आत्मा : मोदी

राज्यसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्र ही सत्ता किंवा सरकारची व्यवस्था नाही. आमच्यासाठी राष्ट्र हा जिवंत आत्मा आहे. संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होऊन देशसेवा करणे हेच काम आहे. मी तरुणांना आवाहन करतो की, संरक्षण क्षेत्रात सहभागी व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा देशाला कुठे घेऊन जायचे आहे, कसे न्यायचे आहे यासाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे.

80 कोटी नागरिकांना मोफत राशन : मोदी

कोरोनाच्या काळात लोक भारताच्या प्रगतीबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत, परंतु भारताने 80 कोटी नागरिकांना मोफत राशन मिळेल याची खात्री केली आहे. गरिबांसाठी विक्रमी घरे बनवली आहेत, ही घरे जलजोडणीने सुसज्ज आहेत, याचीही खातरजमा करण्यात आली. या कोरोनाच्या काळात 80 कोटीहून अधिक देशवासीयांना मोफत राशन देऊन जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे.

भारतातील लोकांनी लस घेतली आहे आणि त्यांनी ती केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी नाही तर इतरांच्या सुरक्षेसाठी घेतली आहे. अनेक जागतिक लसीकरण विरोधी चळवळी दरम्यान असे आचरण कौतुकास्पद आहे.

महामारीच्या काळात देशातील तरुणांनी आपला ठसा उमटवून देशाचा गौरव केला आहे. आमच्या तरुणांनी क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आणि महामारीचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही आणि देशाचा गौरव केला.

MSME क्षेत्राला पॅकेज दिलं : मोदी

कोरोनाच्या काळात एमएसएमई आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. शेतकऱ्यांना अधिक एमएसपी देण्यात आला. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांकडे रोख रकमेची सोय होती. या निर्णयांमुळे आम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्राला वाचवू शकलो. MSME क्षेत्राला आत्मनिर्भर भारत पॅकेजचा सर्वाधिक फायदा झाला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com