Ajit Doval and PM Narendra Modi Saam Digital
देश विदेश

PM Narendra Modi: दहशतवाद्यांचा खात्मा निश्चित! PM मोदी, NSA अजित डोवाल यांच्या भेटीत ठरली मोठी योजना

Jammu Kashmir Terror Attack Update: गेले तीन दिवस जम्मू विभागात दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थिचा आढावा घेतला.

Sandeep Gawade

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता दहशतवादी संघटना जम्मू विभागात दहशत माजवण्याचा कट रचत आहेत. गेल्या तीन दिवसांत जम्मू विभागातील रियासी, कठुआ आणि डोडा येथे सलग हल्ले झाले आहेत. दहशतवाद्यांचा कट हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल आणि गुप्तचर संस्था सतत कार्यरत आहेत. दरम्यान परदेश दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी NSA अजित डोवाल आणि अधिकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी मोदींना संपूर्ण माहिती दिली आहे. मोदींनी अधिकाऱ्यांना दहशतवादविरोधी क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मोदींनी गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली आहे. सुरक्षा दलांची तैनाती आणि दहशतवादविरोधी कारवाया यावर चर्चा झाली आहे. मनोज सिन्हा यांनी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांना दिली.

रविवारी संध्याकाळी रियासी जिल्ह्यातील तेरायथ गावाजवळ दहशतवाद्यांनी यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर गोळीबार केला होता. शिव खोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी ही बस खोल खड्ड्यात पडली होती. या दहशतवादी हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर 41 जखमी झाले आहेत. बसमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीचे भाविक होते.

कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल गावात मंगळवारी रात्री शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल. मात्र, दोन्ही अधिकारी सुखरूप बचावले.

डोडा जिल्ह्यातील भदेरवाह-पठाणकोट मार्गावरील चौकीवर मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान आणि एक एसपीओ जखमी झाला. पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT