Congress on PM Narendra Modi Saam tv
देश विदेश

Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

PM Narendra modi interview : काँग्रेसने भाजपला ४०० जागा संविधान बदलण्यासाठी हव्यात, असा आरोप केला आहे. काँग्रेसच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता शिल्लक टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पार जागा जिंकण्याचा दावा केला आहे. यावरून काँग्रेसने भाजपला ४०० जागा संविधान बदलण्यासाठी हव्यात, असा आरोप केला आहे. काँग्रेसच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या आरोपांच्या प्रश्नावर भाष्य करताना मोदी म्हणाले, 'मला हा प्रश्न विचारण्याआधी माझा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. माझ्या कामाचा अभ्यास करा. तसेच गुजरातचा मुख्यमंत्री असतानाचंही काम तपासा. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत'.

'काँग्रेसने संविधानाचं उल्लंघन केलं. काँग्रेसने धार्मिक आधारावरून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का? असा सवाल मोदींनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी आरक्षणावरून काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंह यांच्या वक्तव्याचा दाखला दिला होता. देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे,असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केल्याचे सांगितलं.

'आम्ही देशात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी कटीबद्ध आहोत. दोन वेगळे कायदे समाजासाठी योग्य नाहीत. एक समाज संविधानाच्या आधारे पुढे जात असेल, तर दुसरा समाज जुन्या विचारात अडकला असेल. त्यासाठी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी आम्ही सर्वकाही करू, असे ते पुढे म्हणाले.

सरकारी तपास यंत्रणेविषयी भाष्य करताना मोदी म्हणाले, 'सरकारी तपासण यंत्रणाची चौकशी हा छोटासा राजकीय भाग आहे. ईडीकडून तपास फक्त ३ टक्के प्रकरणे राजकारण्याशी संबंधित आहेत. मागील ११ वर्षांत सीबीआयकडून तपासलेल्या प्रकरणांपैकी १-१.५ टक्के राजकारणी सामील आहेत, अस मोदींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

पुण्यात विषारी दारूकांड! मृतांचा आकडा २२ वर पोहोचला; प्रशासनाकडून मदत जाहीर, मृत्यूतांडवाला जबाबदार कोण?

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

SCROLL FOR NEXT