narendra modi
narendra modi  saam tv
देश विदेश

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवडणुकीपूर्वीच नवा नारा; म्हणाले, 'मी घडवला हा गुजरात'

Vishal Gangurde

Narendra Modi News : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापरडा येथे उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर मोदी हे वलसाड येथे पोहोचले. या सभेत मोदींनी लोकांना भाजपला जिंकवण्याचे आवाहन केले. 'मला आनंद होत आहे की, आदिवासी बंधू-भगिनींचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या अभियानाला सुरूवात झाली आहे. 'मी घडवला हा गुजरात' हा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, 'माझ्यासाठी आपल्याला भूपेंद्र यांना जिंकवावे लागेल. मला विक्रम तोडण्यासाठी मदत करा'. यावेळी मोदी यांनी गुजरात (Gujrat) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा नारा दिला. मोदी पुढे म्हणाले, 'मला सर्व विक्रम तोडायचे आहे. भूपेंद्र यांचे विक्रम हे माझ्यापेक्षा चांगले पाहिजे. मी त्याच्यासाठी काम करू इच्छित आहे'.

मोदी पुढे म्हणाले,' पहिल्या निवडणुकीच्या प्रचारसभेत आदिवासी बंधू आणि भगिनींचा आशीर्वाद घेऊन करत आहे. जुन्या काळात एका महिने ढोल वाजवले जायचे.हातपंप बसवल्यानंतर गावोगावी झाडांचे वाटप करण्यात यायचे. हातपंप बसवल्यानंतर गावोगावी झाडांचे वाटप करण्यात आले. आज गुजरात सरकारकडून आदिवासी सामाजात २०० मैलापर्यंत पाणी आणण्याचे काम करण्यात येत आहे'.

'एकेकाळी आपण डॉक्टरांची शोधाशोध करायचो. आता आदिवासी भागात रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहेत. गुजरात घडवण्यासाठी प्रत्येक गुजरातींनी मेहनत घेतली. प्रत्येक गुजराती लोकांना प्रचंड आत्मविश्वास असतो. प्रत्येक गुजरातींच्या हृदयातून एक आवाज निघतो, मी हे गुजरात बनवले आहे', असेही मोदी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Babar Azam Record: बाबर आझमने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनीलाही सोडलं मागे

SCROLL FOR NEXT