Rajasthan Assembly Election Results  Saam Tv
देश विदेश

Pm Narendra Modi: PM मोदींचं भाकीत खरं ठरलं, गेहलोत यांच्याबद्दल आधीच केलं होतं 'हे' वक्तव्य

Rajasthan Assembly Election Results : PM मोदींचं भाकीत खरं ठरलं, गेहलोत यांच्याबद्दल आधीच केलं होतं 'हे' वक्तव्य

Satish Kengar

Rajasthan Assembly Election Results :

दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची राजस्थानची तीन दशके जुनी परंपरा पुन्हा एकदा कायम राहिली. राजस्थानच्या जनतेने काँग्रेसला सत्तेपासून दूर करून भारतीय जनता पक्षाकडे (BJP) पाच वर्षांसाठी सत्तेची धुरा सोपवली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाकिताची खूप चर्चा होत आहे. ते म्हणाले होते की, लिहून ठेवा मी जे बोलतोय ते चुकीचं ठरणार नाही.

पंतप्रधान मोदी यांनी काय केलं होतं भाकीत?

निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी अशोक गेहलोत यांच्याबद्दल भाकीत केलं होतं की, ''अशोक गेहलोत पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.'' या निवडणुकीनंतर गेहलोत मुख्यमंत्री होणार नाहीत आणि भविष्यात कधीही हे पद भूषवणार नाहीत, असे ते म्हणाले होते.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या पंतप्रधान मोदींचे हे भाकीत खरं ठरताना दिसत आहे. असं असलं तरी त्यांचं हे भाकीत पूर्णपणे खरे ठरते की नाही हे भविष्यात कळू शकले. मात्र राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, 2028 पर्यंत काँग्रेस नवीन नेतृत्व पुढे आणू शकते. कारण गेहलोत यांचं वाढत वय सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

राजस्थानमधील डुंगरपूर येथे 22 नोव्हेंबर रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हे भाकीत केले होते. मावजी महाराजांच्या भूमीवरून केले जाणारे भाकीत कधीच चुकीचे नसते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

मोदी म्हणाले होते, ''ही मावजींच्या तपश्चर्येची भूमी आहे. इथले अंदाज 100 टक्के खरे ठरतात. त्यांना श्रद्धांजली वाहताना मी एक अंदाज बांधू इच्छितो. राजस्थानच्या लोकांनी ते लिहून ठेवावे, आता पुन्हा राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार कधीच स्थापन होणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT