नरेंद्र मोदी Saam Tv
देश विदेश

१०० कोटींचे लसीकरण हा इतिहासाचा नवा अध्याय - नरेंद्र मोदी

१०० कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ एक आकडा नाही. हा देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय सुरु होतो आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लसीकरणाचे कौतुक केले

साम टिव्ही

नवी दिल्ली : ''भारताने India काल कोरोना लसीकरणाचे Corona Vaccination १०० कोटींचे उद्दीष्ट पार केले. याला भारताच्या संदर्भात बघायचे तर आमच्या देशाने एका बाजूला कर्तव्याचे पालन केले तर दुसरीकडे प्रचंड यश मिळाले. याच्या मागे १३० कोटी देशवासियांची कर्तव्य शक्ती आहे. हे प्रत्येकाचे यश आहे. १०० कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ एक आकडा नाही. हा देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा History नवा अध्याय सुरु होतो आहे,'' असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी भारताच्या लसीकरणाचे कौतुक केले. PM Narendra Modi Praises one billion corona vaccination

मोदी यांनी आज सकाळी देशवासियांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, "हे नव्या भारताचे रुप आहे. आपल्या संकल्प सिद्धीसाठी परिश्रमांची पराकाष्ठा करतो. आज दुसऱ्या देशांची तुलना केली जाते आहे. यावर टीकाही होते आहे. पण आपण ही सुरुवात केव्हापासून केली. भारत दुसऱ्या देशांच्या लसींवर अवलंबून होता. जेव्हा ही महामारी आली तेव्हा भारताबाबत शंका व्यक्त केल्या गेल्या. पैसे कुठून आणणार, लस कधी मिळणार, लस मिळणार की नाही, अशा शंका व्यक्त केल्या गेल्या. आज १०० कोटी लसीचे डोस देऊन सर्व शंकांची उत्तरे आपण दिली आहेत,''

ते पुढे म्हणाले, "१०० कोटी लसींचा प्रभाव असाही होईल की भारत कोरोनाबाबत जगापेक्षा सुरक्षित असेल. पूर्ण जग आज भारताच्या या ताकदीकडे पाहते आहे. भारताची लसीकरण मोहिम 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास' चे उदाहरण आहे. भारतासारख्या लोकशाही देशात या महामारीपासून वाचणे अवघड आहे, असे बोलले गेले. आमच्यासाठी लोकशाही म्हणजे सर्वांना बरोबर घेणे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन लसीकरण सुरु केले. जर रोग भेदभाव करत नाही तर लसीकरणाबाबतही भेदभाव केला जाणार नाही हे तत्त्व ठेवले. कितीही मोठा असेल त्याला सर्व सामान्यांप्रमाणेच लस मिळेल, हे पाहिले,'' PM Narendra Modi Praises one billion corona vaccination

''जगात अनेक विकसित देशात लसीकरण ही समस्या आहे. भारताने या देशांना निरुत्तर केले आहे. जेव्हा सर्वांचे प्रयत्न एकत्रित असतात तेव्हा परिणाम अद्भूतच असतो. देशाने आपली एकजूट दाखवण्यासाठी थाळी, टाळी वाजवली तेव्हा शंका उपस्थित केल्या गेल्या. पण त्यात सामुहिक शक्तीचे जागरण होते. याच ताकदीने कोविड लसीकरणात देशाला १०० कोटींपर्यंत पोहोचवले आहे. एका दिवसात आपण एक कोटी लसीकरणाचे उद्दीष्ट पार पाडले. जे मोठमोठ्या देशांनाही शक्य झाले नाही,'' असाही दावा मोदी यांनी केला.

''आम्ही सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे की भारताची लसीकरण मोहिम पूर्णपणे विज्ञान आधारित होती. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन लसीकरण केले गेले. आमच्यापुढे उत्पादनापासून समस्या होत्या. लसी पोहोचविण्याचेही आव्हान होते. पण वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन भारताने यातून मार्ग काढला. तंत्रज्ञानाचा वापर करुन हे काम झाले. कोविन प्लॅटफाॅर्मची व्यवस्थाही जगात कुतुहलाचा विषय बनली आहे. आज चारी बाजूंना एक विश्वास, उत्साह आहे,'' असेही मोदी म्हणाले.

मेड इन इंडियाची ताकद खूप मोठी आहे. मेड इन इंडिया गोष्ट खरेदी करण्यावर जोर द्या. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हे शक्य होईल. भारतात बनवलेल्या वस्तू व्होकल फॉर लोकल हे तत्व आचरणात आणले पाहिजे. दिवाळी दरम्यान होणारी वस्तुंची विक्री आणि इतरवेळची विक्री यामध्ये खूप मोठा फरक आहे असे देखील मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणले की, जोपर्यंत युद्ध सुरु आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेऊ नका, मास्क वापर करा. जसे आपण शूज घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. तसेच मास्क घातल्याशिवया घराबाहेर पडू नका, असे आवाहन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

SCROLL FOR NEXT