शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दात मांडणं कठीण - नरेंद्र मोदी twitter
देश विदेश

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दात मांडणं कठीण - नरेंद्र मोदी

भारताच्या इतिहासाचे प्रचंड असे ज्ञान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना होते.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने झालेले दु:ख शब्दात मांडणं माझ्यासाठी कठीण आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

तसेच या सोबत मोदींनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत असलेला एक व्हिडिोसुद्धा ट्विट केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे हुशार, ज्ञानी होते. भारताच्या इतिहासाचे प्रचंड असे ज्ञान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त संवाद साधला असं मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे.

तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या कार्यातून आपल्यात जीवंत राहतील.या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती अशा शब्दांत मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Momos Health Risk: मोमोज खाणं आरोग्यासाठी धोक्याचं, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, राजस्थान रॉयल्स संघाचे सामने पुण्यात होण्याची शक्यता

Accident : क्षणात होत्याचं नव्हतं, प्रवाशांनी भरलेल्या दोन बसची समोरासमोर धडक; ६ प्रवाशांचा मृत्यू

मेंदूच्या नसा कमकुवत झाल्या की शरीर देतं हे संकेत

Gauri Garje Case: 'श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या', डॉक्टर गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT