PM Narendra Modi SAAM TV
देश विदेश

PM Modi या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; ब्रिटिश संसदेतही वाहवा, VIDEO बघा

PM Narendra Modi यांचं ब्रिटिश संसदेत खासदारानं तोंडभरून कौतुक केलं.

Shivaji Kale

PM Narendra Modi most powerful : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगभरातून कौतुक होत आहे. आता ब्रिटिश खासदारानं थेट ब्रिटिश संसदेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खासदार लॉर्ड करन बिलिमोरिया यांचं ब्रिटिश संसदेतील भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Narendra Modi

ब्रिटिश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर गाजताना पाहायला मिळत आहे. ब्रिटीश संसदेत केलेल्या या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. भारत ही जगात तेजीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, असं खासदार बिलिमोरिया यांनी ब्रिटिश संसदेत केलं.

व्हिडिओ बघा

बिलिमोरिया यांनी संसदेत केलेल्या भाषणात मोदींचे कौतुक केले. ‘मोदी यांनी त्यांच्या वडिलांसोबत गुजरात स्टेशनवर चहा विकला. आज ते सर्वात ताकदवान व्यक्ती आहेत. भारत हा येणाऱ्या काळात यूकेचा सर्वात जवळचा मित्र असायला हवा. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे,' असेही ते म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, भारत एक युवा देश आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर ८.७ टक्के इतका होता, असं म्हणत भारताच्या विकासदरावरून देखील खासदार बिलिमोरिया यांनी भारताची स्तुती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT