PM Narendra Modi ...तर मुंबईचा विकास जलदगतीने होईल; मोदींनी सांगितला शहराच्या विकासाचा मंत्र

मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास जलद गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
PM Narendra Modi Live
PM Narendra Modi Live ANI
Published On

PM Narendra Modi Live : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. पण मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास जलद गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.  (Latest Marathi News)

PM Narendra Modi Live
Eknath Shinde Speech in Mumbai: मला दावोसमध्ये काही लोक भेटले, तेही मोदींचेच भक्त होते; CM शिंदे काय म्हणाले, वाचा

यावेळी मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. 'आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं', असं ते म्हणाले.

आज मुंबईच्या (Mumbai) विकासाशी संबंधित ४० हजार कोटीं रुपायांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वी देशात फक्त गरीबीवर चर्चा करत वेळ काढला जायचा, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. भारत आपल्या सामर्थ्यांच्या योग्य वापर करत आहे. भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे. असेही ते म्हणाले.

PM Narendra Modi Live
Narendra Modi : पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल; शिंदे-फडणवीसांनी केलं जंगी स्वागत, महाराष्ट्राकडून दिली अनोखी भेट

मुंबईत विकास कामं जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत २०१४ पासून विकासकामांना गती मिळाली. पण मधल्या काळात म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीसांचं केलं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल .मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com