PM Modi AI training announcement for one crore youth साम टीव्ही मराठी
देश विदेश

PM Modi : स्वातंत्र्यदिनी मोदींचे देशातील तरुणांना मोठे गिफ्ट! आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

PM Modi AI training announcement for one crore youth : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात एक कोटी तरुणांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली.

Namdeo Kumbhar

PM Modi AI training announcement for one crore youth : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. येत्या वर्षभरात देशातील १ कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.

केंद्र सरकार येत्या एका वर्षात १ कोटी तरुणांना AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) स्किल ट्रेनिंग देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केली. तसेच, तरुणांसाठी 'मोफत ऑनलाइन कोचिंग' देण्याची घोषणाही त्यांनी केली.

या उपक्रमांतर्गत देशातील युवा पिढीला AI आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये कुशल बनवण्यासाठी संपूर्ण मोफत शिकवणी आणि प्रशिक्षण पुरवले जाणार आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण करणे आणि तरुणांना भविष्यातील रोजगाराच्या नवीन संधींसाठी सक्षम करणे, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.

याशिवाय स्पर्धा परीक्षा आणि नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी तरुणांना केंद्र सरकारतर्फे मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून दिले जाईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या या ऐतिहासिक प्रवासात देशातील युवा वर्ग सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा भारत 'विकसित राष्ट्र' बनेल, तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा आणि चांगला परिणाम देशातील तरुणांच्याच भविष्यावर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र FDA ची राज्यभर धडक कारवाई; 9.76 कोटींचा संशयित अन्नसाठा जप्त

ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत काय ठरणार? भारतासाठी का महत्त्वाची आहे अमेरिका-चीन चर्चा?

IAS अन् IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या कोण करतं? कोणाकडे आहे इतकी मोठी पॉवर?

Toenails Turn Black: पायांची नखं अचानक काळी-पिवळी पडतायत? जाणून घ्या यामागची ३ प्रमुख कारणे

दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी प्यायल्यानं काय होतं?

SCROLL FOR NEXT