Modi Govt. Lakshadweep Plan Saam Digital
देश विदेश

Modi Govt. Lakshadweep Plan: लक्षद्वीपमध्ये बनणार नवीन विमानतळ, लढाऊ विमानेही असणार तैनात, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लान?

Modi Govt. Lakshadweep Plan News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. लक्षद्वीपमधील पर्यटनालाही प्रोत्साहन देणे हा एक उद्देश असून येथील मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

Modi Govt. Lakshadweep Plan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. लक्षद्वीपमधील पर्यटनालाही प्रोत्साहन देणे हा एक उद्देश असून येथील मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. दुहेरी उद्देशाने हे विमानतळ उभारण्यात येत असून लढाऊ विमाने, लष्करी आणि व्यावसायिक विमानेही उतरवली जाणार आहेत. नागरी विमानेही उतरवण्याची योजना आहे. विमानतळाच्या उभारणीनंतर लष्करी विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ शक्य होणार आहे.

सरकारकडे यापूर्वी केवळ लष्करी वापरासाठी एअरफील्ड बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता. मात्र आता नागरी उड्डाणांसाठीही परवानगी देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात भारताचा कडक नजर ठेवता ठेवण्यांसह समुद्र चाच्यांच्या कारवायांना आळा घालता येणार आहे. नौदल आणि हवाई दलासाठी ऑपरेशन करणे सोपे जाणार आहे. धावपट्टी बाधण्याचा पहिला प्रस्ताव भारतीय तटरक्षक दलाने दिला होता. सध्याच्या प्रस्तावानुसार हे विमानतळ भारतीय हवाई दलाकडून चालवलं जाणार असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या लक्षद्वीपमध्ये एकच हवाई पट्टी असून ती आगती बेटावर आहे. याठिकाणी सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत. त्यामुळे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लक्षद्वीपचा संपूर्ण बेट समूह चर्चेत आला आहे. प्रतावित विमातळांवर नागरी विमाने उतरली तर मालदीव प्रमाणेच लक्षद्वीपच्या पर्यटनाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT