Pm Narendra Modi and Nitish Kumar Saam tv
देश विदेश

Narendra Modi : मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यासहित इतर कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एनडीएची संसदीय बैठक झाल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी येत्या रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिपदाची कोण शपथ घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नव्या मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आता रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी रविवारी सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. नव्या मोदी सरकारमध्ये भाजपचे १८ खासदार मंत्रिमंडळात असतील. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना एकूण १८ मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात ७ कॅबिनेट आणि ११ राज्यमंत्रिपदे असतील.

नव्या सरकारमध्ये तेलुगू देसम पक्ष आणि जनता दल युनाटेडचे दोन मंत्री असण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एलजीपी, जेडीएस हम पक्षाला प्रत्येकी १ मंत्रिपदे असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शपथविधीनंतर नवनियुक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी ९ जून रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीयमंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शिंदे गटात कोणाच्या गळ्यात माळ पडणार?

शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकाच कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भविष्यात १ मंत्रिपद देण्याचं आश्वासन शिंदे गटाला देण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT