PM MODI ON GOLD AND SILVER PRICE FALL saam tv
देश विदेश

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

PM Modi Explains the Gold and Silver Price Fall: सोन्या-चांदीच्या दरात घसरण का होत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊमधील कार्यक्रमात एक वर्षापूर्वी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. तसेच कौशल्य विकास, आयटीआय विद्यार्थी आणि रोजगाराबाबत महत्त्वाचे भाष्य केले.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT च्या तरुणांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कौशल्य विकास, रोजगार, कृत्रिम बुद्धिमता (AI), देशातील उत्पादन क्षेत्र आणि तरुणांच्या भविष्याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले. ज्याच्याकडे कौशल्य आणि जिद्द आहे, त्याचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आगामी काळात स्किल असलेल्या तरुणांची मागणी वाढणार आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी मी देशातील नागरिकांना एक वर्ष सोने-चांदी खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. देशातील नागरिकांनी माझे म्हणणे ऐकले असून त्याचा परिणाम आज दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कौशल्य विकास कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना मोदी म्हणाले, तुम्ही लिहून ठेवा, काळ बदलत आहे. केवळ कागदी प्रमाणपत्र घेऊन फिरणाऱ्यांपेक्षा कौशल्य असलेल्या लोकांचा सन्मान वाढणार आहे. ज्याच्याकडे कोशल्य आहे, त्याची मागणी वाढणार आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना समाजात मिळणाऱ्या वागणुकीबाबतही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ब्रिटिशांनी भारतातील कौशल्याधारित उद्योगांना मागे टाकून स्वतःच्या देशातील उद्योगांना पुढे नेले. भारतातील अनेक गोष्टी ते आपल्या देशात घेऊन गेले आणि उत्पादन क्षेत्राचा विस्तार केला. कालांतराने कागदी कामाला अधिक महत्त्व मिळू लागले आणि कौशल्य मागे पडले.

आजही एखादे मूल आयटीआयमध्ये प्रवेश घेत असेल, तर काही जण नातेवाईकांना सांगण्याऐवजी ही गोष्ट लपवतात. ही परिस्थिती मला बदलायची आहे. IITच्या विद्यार्थ्यांना जितका सन्मान मिळतो, तितकाच सन्मान ITIच्या विद्यार्थ्यांनाही मिळाला पाहिजे, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. मोठमोठ्या कंपन्यांना केवळ प्रमाणपत्रधारकांची गरज नसते, तर कंपनीला बळ देण्यासाठी 200 ते 300 कुशल आयटीआय आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

SCROLL FOR NEXT