PM Narendra Modi On Congress protest in black clothes SAAM TV
देश विदेश

PM Modi| कितीही काळी जादू करू द्या, पण...; PM मोदींचा काँग्रेस नेत्यांवर काळ्या कपड्यांवरून निशाणा

काळे कपडे परिधान करून केंद्रातील सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi | नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पानिपतमधील टू-जीच्या एका इथेनॉल प्रकल्पाचं व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन केलं. या प्रकल्पासाठी नऊशे कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प तब्बल ३५ एकरात उभारण्यात आला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. कितीही काळी जादू केली तरीही जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही, असं मोदी म्हणाले.

देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यावेळी निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की 'आपल्या देशातही काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नैराश्यात बुडालेले आहेत. सरकारच्या (Government) विरोधात खोटं पसरवण्याचं काम वारंवार करत आहेत. पण अशा लोकांवर देशातील नागरिक विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत आता हेच लोक काळी जादू करण्याचा प्रयत्न करत आहेत.'

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) अप्रत्यक्ष निशाणा साधला. आम्ही ५ ऑगस्ट रोजी बघितलं की कशाप्रकारे काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काळे कपडे घालून त्यांच्या नैराश्याचा काळ संपेल, असे त्यांना वाटत आहे. पण कितीही काळी जादू केली तरी, जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा बसणार नाही हे त्यांना ठाऊक नाही, असा टोला मोदी यांनी लगावला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी मोफतच्या घोषणा करण्यासंदर्भातही भाष्य केले. राजकारणात स्वार्थ असेल तर, कुणीही येऊन पेट्रोल-डीझेल मोफत देण्याची घोषणा करू शकतं. असे प्रकार आपल्या देशातील मुलांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतील. देशाला आत्मनिर्भर करण्यापासून रोखतील. अशा स्वार्थी धोरणांमुळं देशातील प्रामाणिक करदात्यांवरील ओझे वाढू शकते, असंही मोदी म्हणाले.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकारच्या घोषणा करणारे कधीच नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक करणार नाहीत. ते शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देतील. पण त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलसारखे प्रकल्प कधीच उभारणार नाहीत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT