PM Narendra Modi saam tv
देश विदेश

PM Narendra Modi Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन! लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्या शुभेच्छा

PM Narendra Modi congratulated Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी कर्नाटकमधील विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन केले आहे.

Chandrakant Jagtap

PM Narendra Modi congratulated Congress for its victory in Karnataka : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाी कर्नाटकमधील विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन केले आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा", असं ट्वीट मोदींनी केले आहे.

तसेच, "कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असेही ते म्हणाले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर झाले आहेत. कर्नाटकात परिवर्तन घडवत मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. कर्नाटकात काँग्रेसला 136 जागा मिळताना दिसत आहेत. आतापर्यंत काँग्रेसने येथे 122 जागांवर विजय मिळवला आहे, तर 14 जगांवर अजूनही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दुसरीकडे भाजपला कर्नाकात मोठ्या पराभवाला समोरे जावले लागले आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ 64 जागा मिळताना दिसत आहे. यातील 56 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे, तर 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. (Latest Political News)

दरम्यान जनता दल सेक्यूलर पक्षाला देखील 20 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. आतापर्यंत जेडीएसचे 18 उमेदवार निवडूण आले आहेत, तर 2 जागांवर जेडीएसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

SCROLL FOR NEXT