PM Narendra Modi Saam TV
देश विदेश

PM Narendra Modi : लोकसभा निवडणूक प्रचारात मोदींना आठवले मणिपूर; म्हणाले, संवेदनशील मुद्द्यावर...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे. केंद्र सकरकारने वेळीच हस्तक्षेप करत मणिपूर सरकारच्या मदतीने येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

Political News :

महाराष्ट्रासह अन्य राज्यांत लोकसभा निवडणुकांची तयारी, प्रचार आणि सभा होत आहेत. मणिपूरमध्ये देखील पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने येथे प्रचार करण्यास सुरूवात केलेली नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे. केंद्र सकरकारने वेळीच हस्तक्षेप करत मणिपूर सरकारच्या मदतीने येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मणिपूरमधील हिंसाचार आणि येथील संघर्ष संपवण्यासाठी आम्ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. येथील संघर्ष शिगेला पोहचला होता तेव्हा गृहमंत्री अमित शहा स्वत: मणिपूर गाठलं आणि वाद शांत करण्यास उपाययोजना केल्या. यावेळी शहांनी तेथे १५ हून अधिक बैठका देखील घेतल्या, या बाबद मोदींनी माहिती दिली आहे.

आसाम ट्रिब्यून या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी असं म्हटलं आहे. मुलाखतीत पुढे त्यांनी म्हटलं की, कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाताना आपण एकत्र असणे गरजेचे आहे. ही आपली सामुहीक जबाबदारी आहे. देशातील जातीवाद संपवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाययोजना करत आहोत, असंही मोदी म्हणाले.

पुढे राज्यात शांती आणि जातीय तेढ निर्माण न होण्यासाठी भाजप सरकार वेळोवेळी भूमिका घेत आहे, असंही मोदी म्हणाले. आम्ही वेळीच मणिपूर हिंसाचारात हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती आता आटोक्यात आहे.

मैतेई जातीला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी ३ मे २०२३ मध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (ATSUM) ने ' एकता मार्च' काढला होता. यामध्ये मैतेई आणि कुकी या दोन जातीमधील नागरिकांमध्ये मोठा वाद झाला. पुढे या वादाला हिंसाचाराचे रुप प्राप्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airplane Facts: विमान क्रॅश झालं, अचानक इंजिन बंद पडलं तर...त्याक्षणी काय करावं, वाचा सविस्तर

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांवर उद्या अंत्यसंस्कार होणार

Ajit Pawar Plane Crash: ८.४६ मिनिटं.. अचानक मोठा स्फोट, आगीच्या ज्वाळा...विमान कोसळतानाचा CCTV व्हिडिओ समोर

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला? विमान कंपनीने सांगितलं खरं कारण

Eknath Shinde : मी मोठा भाऊ गमावला...अजित पवार यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावुक

SCROLL FOR NEXT