PM Modi Diwali Celebrations Saam Tv
देश विदेश

PM Modi Diwali Celebrations: पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, सैनिकांना स्वत:च्या हाताने भरवली मिठाई

Diwali 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छमध्ये जवानांसोबत आपली दिवाळी सजली केली.

Satish Kengar

देशासह जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळीही जवानांसोबत दिवाळी सजली केली. यावेळी पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये पोहोचले होते.

गुजरातमधील कच्छमध्ये पंतप्रधान मोदींनी दिवाळीनिमित्त सैनिकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सैनिकांशी संवादही साधला, त्यांची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी जवळपास एक तास तिथे थांबले होते. पंतप्रधानांनी जवानांना स्वत:च्या हाताने भरवली मिठाई.

देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी अमृतसरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

2016 मध्ये त्यांनी किन्नौर, 2017 मध्ये बांदीपोरा, 2018 मध्ये उत्तरकाशी, 2019 मध्ये राजौरी, 2020 मध्ये जैसलमेर, 2021 मध्ये नौशेरा, 2022 मध्ये कारगिल आणि 2023 मध्ये लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.

भारत - चीन सीमेवर एकमेकांना मिठाई देत सैनिकांनी साजरी केली दिवाळी

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. याच्या एक दिवसआधीच दोन्ही देशांच्या सैन्याने एलएसीवरून आपल्या चौक्या मागे घेतल्या होत्या. गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह (LAC) अनेक सीमेवर मिठाईची देवाणघेवाण झाली. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: RCB चा शिलेदार पंजाबच्या ताफ्यात! मॅक्सवेलवर लागली अवघ्या इतक्या कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: 26 नोव्हेंबरनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार

KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; KL Rahulवर या संघाने लावली मोठी बोली

Balaji Kinikar News : माझ्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेला, आमदार बालाजी किणीकरांनी व्यक्त केली भावना

IPL 2025 Mega Auction: लॉस झाला ना भावा! स्टार्कला मिळाली ५० टक्क्याहून कमी रक्कम; कोणत्या संघाने लावली बोली?

SCROLL FOR NEXT