4 states assembly election 2023 result Saam TV
देश विदेश

Election Results 2023 : जिथे पराभव तिथेच ताकदीनं घाव, काँग्रेसने जिंकलेली राज्ये भाजपने परत कशी मिळवली?

Satish Daud

4 States Assembly Election 2023 Result

भाजपने लोकसभेची सेमीफायनल निवडणूक जिंकली आहे. मध्य प्रदेशातील सत्ता टिकवत भाजपने राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही जोरदार मुसंडी मारली आहे. दोन राज्यांमधील काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावण्यात भाजपला यश मिळालं आहे. विशेष बाब म्हणजे २०१८ साली या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पण भाजपने ऑपरेशन लोटस राबवत सत्ता काबिज केली होती. तरीही राजस्थान आणि छत्तीडगड काँग्रेसच्या ताब्यात होते. सध्या मध्य प्रदेशातील २३० पैकी १६० पेक्षा अधिक जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहे. (Telangana Assembly Election Results 2023)

तर राजस्थानमध्ये ११० हून अधिक जागा आणि छत्तीसगडमध्ये देखील भाजप बहुमताच्या जवळ आहे. काँग्रेसची सत्ता घालवण्यात भाजपला यश आलं आहे. या तिन्ही राज्यांमधील विजयामुळे पुन्हा एकदा मोदी-शहांच्या ब्रँडची जादू अधोरेखित झाली आहे. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)

निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची प्रमुख कारणं

  • तिन्ही राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा होताच भाजपने १ महिना आधी तिकीट वाटप केलं. त्याचा फायदा भाजपला आहे.

  • लवकर तिकीट मिळाल्याने उमेदवारांना निवडणुकीची तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकले.

  • पंतप्रधान मोदींनी केंद्रातील अनेक मंत्री निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राज्यांमध्ये पाठवले होते. या मंत्र्यांनी भाजपला मतदान करण्याचं महत्व मतदारांना समजावून सांगितलं.

  • तिन्ही राज्यांमध्ये भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उघड केला नव्हता. त्यामुळे प्रत्येक नेत्याने निवडणुकीत जोमाने काम केलं.

  • यंदा तिन्ही राज्यांमध्ये भाजपनं पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. त्याचा परिणाम दिसला.

  • तिन्ही राज्यांमध्ये मोदींनी अनेक रॅली, रोड शो केले. भाजपनं निवडणूक प्रचार मोदींच्या अवतीभवती ठेवला.

  • मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रत्येकी १५ रॅली केल्या. तर राजस्थानमध्येही ४ रॅली केल्या. जयपूर आणि बिकानेरमध्येही रोड शो केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT