PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi: भारताकडे दोन शक्ती लोकसंख्या आणि लोकशाही, जगानेही हे स्विकारलं - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुदुच्चेरी येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Swami Vivekananda’s Jayanti: पुदुच्चेरी: आज (12 जानेवारी) महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) यांची जयंती आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यासोबतच पंतप्रधान मोदी येथे कार्यक्रमाला संबोधितही केले (PM Narendra Modi At 25th national youth festival taken at Puducherry)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुदुच्चेरी येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, "स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मी नमन करतो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात त्यांची जयंती अधिक प्रेरणादायी झाली आहे. हे वर्ष दोन आणखी कारणांमुळे विशेष ठरले आहे. आपण याच वर्षी श्री अरविंदो यांची 150 वी जयंती साजरी करणार आहोत. याच वर्षी महाकवी सुब्रमण्यम भारती 100 वी पुण्यतिथी आहे. या दोघांचेही पुद्दुचेरीशी खास नातं आहे. त्यामुळे पुद्दुचेरीमध्ये घेण्यात येणारं नॅशनल युथ फेस्टिवल हे या दोघांना समर्पित असेल".

"आज पुद्दुचेरीमध्ये एमएसएमई इकोलॉजी सेंटरचं उद्घाटन झालं. याचा एमएसएमई सेक्टरमधील रोल हा आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. आपले एमएसएमई त्या तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जी आज जगात बदल घडवून आणत आहे. त्यामुळे देशात आज टेक्नोलॉडी सेंटर सिस्टम प्रोग्रामचा एक मोठं अभियान चालवण्यात येत आहे. पुद्दुचेरीमधील एमएसएमई सेंटर त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे".

"पुद्दुचेरीच्या तरुणांना कामराज यांच्या नावावर एक सभागृह मिळत आहे, हे सभागृह कामराज यांच्या योगदानाचे स्मरण तर देईलच त्यासोबतच तरुणांना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्यासाठी एक मंच देईल".

"जग भारताकडे आशेने पाहाते. कारण, भारताचा जन युवा आहे आणि मन देखील युवा आहे. भारत आपल्या सामर्थ्यानेही तरुण आहे, आपल्या स्वप्नांनीही तरुण आहे, आपल्या चिंतनेही युवा आहे, आपल्या चेतनेनेही तरुण आहे. कारण, भारताने नेहमी आधुनिकतेला स्विकारलं आहे. परिवर्तन स्विकारलं आहे. भारताच्या प्राचीनतेमध्येही नवीनता आहे", असं मोदींनी सांगितलं.

"जेव्हा भारताला स्वातंत्र्यासाठी क्रांतीची गरज असते, तेव्हा सरदार भगत सिंगांपासून ते चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत कित्येक तरुण देशासाठी आपलं सर्वस्व देतात. जेव्हा भारताला अध्यात्माची गरज असते, तेव्हा अरविंदोपासून ते सुब्रमण्यम भारती यांच्यापर्यंत साक्षात्कार होतो. जेव्हा भारताला त्याचा हरवलेला स्वाभिमान पुन्हा मिळवण्याची अधिरता असते, तेव्हा स्वामी विवेकानंद सारखे एक तरुण भारताच्या ज्ञानाने जगातील मानसला जागृत करतो", असं मोदी म्हणाले.

"जगाने हे स्विकारलं आहे की आज भारताकडे दोन शक्ती आहेत. एक लोकसंख्या आणि दुसरी लोकशाही. ज्या देशाकडे जितकी युवा लोकसंख्या आहे. त्याच्या सामर्थ्याला तितकंच मोठं मानलं जातं. भारतातील तरुणांकडे लोकसंख्येसोबतच लोकशाहीचे मुल्यही आहे. भारत आपल्या तरुणांना लोकसंख्याशास्त्रीय लाभांशसह विकासकी मानतात. आज भारताचा तरुण विकासासोबत आपल्या लोकशाहीचे मुल्यांचंही नेतृत्व करत आहे", असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

SCROLL FOR NEXT