PM Narendra Modi X
देश विदेश

PM Narendra Modi : आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसण्याची किंमत मोजावी लागली; PM मोदी पाकिस्तानवर कडाडले

PM Narendra Modi on Operation sindoor : PM नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी मोदींनी ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केलं.

Vishal Gangurde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानविरोधात दाखवलेल्या वीरतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांची पाठ थोपटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केलं. यावेळी पाकिस्तानच्या भूमिकेवरही टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ८ वाजता देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी सैन्याच्या शौर्याला, धाडसाला, पराक्रमाला आज समर्पित करतोय. देशाच्या माता भगिनी आणि मुलींना हे पराक्रम समर्पित करतो. २२ एप्रिल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता, त्याने देश आणि जगाला हादरा बसला'.

'पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर मुलांसमोर निर्दयीपणे मारलं. हे दहशतवादाचं बिभत्स चेहरा होता. क्रूरता होती. हा देशाच्या सद्भावनेला तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या हे दुःख खूप मोठं होतं. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, समाज, प्रत्येक वर्ग, पक्ष एका स्वरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी एकत्र आला. उभा राहिला, असे ते म्हणाले.

'आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला संपूर्ण सूट दिली. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक संघटना समजले की आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसण्याची किती मोठी किंमत मोजावी लागली. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी नागरिकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.

'६ मे च्या मध्यरात्री , ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना बघितलं. भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर नेमका प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश एकजूट होतो तेव्हा, राष्ट्र प्रथम या भावनेने भारलेला असतो तेव्हा पौलादी निर्णय घेतले जातात, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT